आपल्या शरिराचा ६० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे शरिरात होणारे बायो केमिकल रिअॅक्शन, शरिरातील पोषक तत्वांचा योग्य पद्धतीने पुरवठा, शरिरातील घाण बाहेर काढणे, शरिराचे तापमान आणि रक्त पुरवठा नियंत्रण करण्याचे काम केले जाते. ऐवढेच नव्हे तर, पाचनक्रिया, कब्ज, हृदयाचे ठोके, अवयव, रक्तवाहिन्यासाठी एक महत्वाचे तत्व आहे. जर शरिरात याची कमतरता भासली तर आपण डिहायड्रेट होऊ शकतो आणि त्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण स्वत:ला हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. परंतु उन्हाळ्यात जेव्हा आपल्या शरिरातून अधिक घाम बाहेर पडतो तेव्हा शरिराला पाण्याचा पुरवठा करणे फार गरजेचे असते. जर शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर सनबर्न, सन स्ट्रोक सारखी समस्या येऊ शकते. अशातच तुम्ही स्वत:ला उन्हाळ्यात हायड्रेट कसे ठेवू शकता याचबद्दलच्या काही टीप्स जाणून घ्या. (Stay hydrated in Summer)
-पाणीदार फळांचे सेवन करा
उन्हाळ्यात अशा फळांचे सेवन करा ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असेल. म्हणजेच रसाळ फळं खा. टरबूज, कलिंगड, द्राक्ष अशी फळं खा. या व्यतिरिक्त तुम्ही काकडी, टोमॅटो सारख्या भाज्यांचा आपल्या जेवणात समावेश करा.
-या गोष्टींपासून दूर रहा
काही खाण्यापिण्याच्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्या शरिराला डिहाइड्रेट करतात. जसे की, कॉफी, सोडा, बियर, वाइन, लेमनेड, एनर्जी ड्रिंक. कारण यामध्ये साखर आणि मीठाचे प्रमाण अधिक असते जे शरिरातील पाणी कमी करु शकते.
-अंघोळ करा
उन्हाळ्यात अधिक घाम येतो. यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. जर तुम्ही थंड पाण्याने या दरम्यान अंघोळ केली तर अधिक घाम येत नाही आणि डिहाइड्रेशनची समस्या ही उद्भवत नाही.
-डिटॉक्स ड्रिंक्स प्या
एका पाण्याच्या बाटलीत लिंबू, संत्र, पुदीना, काकडी अशी फळं टाकून ठेवा. ती बाटली फ्रिडमध्ये ठेवून द्या. तुम्ही ते दिवसभर कधी ही पिऊ शकता. हे डिटॉक्स ड्रिंक तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Stay hydrated in Summer)
हे देखील वाचा- ब्रोकोली खात असाल तर ‘या’ व्यक्तींनी सावध रहा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
-नारळाचे पाणी
नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम, पोटेशियल, कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हे शरिरात इलेक्ट्रोलाइटचा स्तर नियंत्रित राखण्यास मदत करते. यामधअये कॅलरी आणि साखरेव्यतिरिक्त पोटेशियम ही असते. त्यामुळे आपण हायड्रेट राहतो.
-भरपूर प्रमाणात पाणी प्या
उन्हाळ्यात घाम येत असल्याने शरिराला पाण्याची गरज भासते. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर जाऊन फिरतीचे काम करत असाल तर वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन तुम्ही हायड्रेट रहाल.