Home » स्वातंत्र्याच्या वेळी देशात किती राज्य होती? कधी आणि कसे झाले नवे प्रदेश

स्वातंत्र्याच्या वेळी देशात किती राज्य होती? कधी आणि कसे झाले नवे प्रदेश

by Team Gajawaja
0 comment
States during formation of India
Share

आपल्याला भारताच्या नकाशावर जी राज्य पाहतो ती देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सुद्धा होती का? परंतु तसे नव्हते. खरंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तो काही रियासतमध्ये वाटला गेला होता. तेव्हा देशात ५५२ रियासत (Princely state) होती. जर राज्याच्या आधारावर पाहिल्यास भारताला ब्रिटीश इंडियाचे राज्य, रियासत, पोर्तुगालच्या वसाहती म्हणून विभाणी केली जाऊ शकत होती. स्वातंत्र्यानंतर त्यांना एकत्रित करणे हे एक मोठे आव्हान होते. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी भारताच्या रियायतांना एकत्रित करण्यास मुख्य भुमिका बजावली होती.(States during formation of India)

स्वातंत्र्यावेळी कसा होता भारत?
देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, हरियाणा सारखे राज्य नव्हते. तेव्हा त्यांना इंग्रजांद्वारे तयार करण्यात आलेल्या सेंट्रल प्रॉविंस, युनाइडेट प्रॉविंस (आता उत्तर प्रदेश), बॉम्बे प्रॉविन्स, सेंट्रल इंडिया, मद्रास प्रेडिजेंसी स्टेट होते. स्वातंत्र्यानंतर भारतात मैसूर, पंजाब, मद्रास, बॉम्बे, उडीसा, बंगाल, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, आसाम, राजस्थान आणि जम्मू-कश्मीर होते. अंदमान आणि निकोबर द्वीप समूह, दिल्ली, लाकादिव, मिनिकोय आणि अमिंडी द्वीप समहू केंद्र शासित प्रदेश होते.

१९५३ मध्ये झाली राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ब्रिटीश राजवटीची ‘राज्ये’ भाषेच्या आधारावर विभागण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली. न्यायाधीश फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर १९५३ ला पहिल्या राज्य पुनर्गठन आयोगाचे गठन झाले. या आयोगाचे तीन सदस्य न्यायाधीश फजल अली, हृदयनाथ कुंजर आणि के. एम. पाणिकर होते. या आयोगाद्वारे आपला रिपोर्ट सोपवल्यानंतर नव्या राज्यांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. दरम्यान त्यावेळी हैदराबाद, जूनागढ, भोपाळ आणि कश्मीर हे भारताचा हिस्सा बनण्यास तयार नव्हते.

हे देखील वाचा- सुप्रीम आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांची कशा प्रकारे केली जाते नियुक्ती?

States during formation of India
States during formation of India

कशी झाली राज्यांची निर्मिती?

-जम्मू- कश्मीर (१९४८): जम्मू-कश्मीरचे राजा हरिसिंह यांनी भारतात विलिकरण होण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. १९५६ मध्ये त्याला भारतीय संघाचा हिस्सा असल्याचे घोषित करण्यात आले. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्ज संपवत त्याला केंद्र शासित प्रदेशात परिवर्तित करण्यात आले.

-उत्तर प्रदेश (१९५०): उत्तर प्रदेश होण्यापूर्वी त्याला युनाइटेड प्रॉविंसच्या नावाने ओळखले जायचे. त्यामध्ये अवध आणि आगरा यांचा सुद्धा समावेश होता.

-बिहार (१९५०): २२ मार्च १९१२ मध्ये या राज्याला इंग्रजांनी तयार केले होते. २६ जानेवारी १९५० मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला होता. २००० मध्ये बिहार पासून वेगळे करत झारखंड नावाचे एक नवे राज्य तयार करण्यात आले.

आसाम (१९५०): इंग्रजांनी १८२६ मध्ये आसामला आपल्या अधिकारांमध्ये घेतले होते. १९७४ मध्ये त्याला बंगालपासून वेगळे करण्यात आले होते. १९१२ मध्ये त्याचे पुनर्गठित करण्यात आले होते. मेघालय, नागालँन्ड आणि मिजोराम यांचा सुद्धा यामध्ये समावेश होता.

-ओडिसा (१९५०): १ एप्रिल १९३६ मध्ये इंग्रजांनी ओजिसाला एक वेगळे राज्य म्हणून घोषित करण्यात आले. १९५० मध्ये तो भारताचे राज्य झाले आणि २०११ मध्ये त्याचा नाव बदलून ओडिसा असे ठेवण्यात आले.

-तमिळनाडू (१९५०): ब्रिटिश शासनकाळात मद्रास प्रेजिंडेंसी असे तमिळनाडूला म्हटले जात होते. १९५० मध्ये तो भारतीय प्रांत झाला आणि १९६९ मध्ये त्याचे नाव तमिळनाडू असे ठेवण्यात आले.

-आंध्र प्रदेश (१९५३): १ नोव्हेंबर १९५६ रोजी याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला. यापूर्वी तो मद्रासचा हिस्सा होता. यामधील काही क्षेत्र हैदराबादचा सुद्धा समावेश होता. त्यानंतर २ जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाच्या उत्तर-पश्चिम भागांना तेलंगणा असे नाव दिले गेले.

-मध्य प्रदेश (१९५६): ग्वालियर, इंदौर, भोपाल रियासत यांना एकत्रित करुन मध्यप्रदेश तयार करण्यात आला. त्यावेळी मध्य भारत आणि सेंट्रल प्रोविंस यांना मिळून बनवले होते. २००० मध्ये त्याचे विभाजन करु छत्तीसगढ हे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले.

-केरळ (१९५६): त्रावणकोर, कोचीन आणि मलबार यांचे विलीनीकरण करून केरळ राज्याची स्थापना १९५६ मध्ये झाली.

-कर्नाटक (१९५६): १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्याची स्थापना झाली. १९७३ मध्ये राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले.

महाराष्ट्र-गुजरात (१९६०): महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे भाग होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन करून दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.(States during formation of India)

-नागालँड (१९६३): नागालँड राज्याची स्थापना १डिसेंबर १९६३ रोजी आसामपासून नागा प्रदेश वेगळे करून झाली.

-पंजाब (१९६६): आठ लहान संस्थानांचे पटियाला राज्यात विलीनीकरण करून पंजाबची स्थापना झाली. १९६६ मध्ये हरियाणा पंजाबपासून वेगळे झाले आणि चंदीगडला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनवण्यात आली.

-हिमाचल प्रदेश (१९७१): हिमाचल प्रदेश १९५० मध्ये ३० संस्थानांचे विलीनीकरण करून स्थापन झाला. १९५६ मध्ये ते केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आणि २५ जानेवारी १९७१ रोजी ते पूर्ण राज्य बनले.

-मणिपूर (१९७२): मणिपूरलाही १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले.१९५६ मध्ये तो केंद्रशासित प्रदेश बनला आणि २१ जानेवारी १९७२ रोजी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.

-मेघालय (१९७२): मेघालय १९७० मध्ये आसाम अंतर्गत स्वायत्त राज्य बनले. त्याला २१ जानेवारी १९७२ रोजी पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.

-त्रिपुरा (१९७२): हे राज्य बांगलादेशने तीन बाजूंनी वेढलेले आहे. १९७२ पर्यंत हा केंद्रशासित प्रदेश होता. यानंतर ते पूर्ण राज्य करण्यात आले.

-सिक्कीम (१९७५): हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे. १६ मे १९७५ रोजी ते भारतीय संघराज्याचा एक भाग बनले.

-गोवा (१९८७): भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा भाग पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. १९६१ मध्ये भारतीय लष्कराने तो मुक्त केला आणि तो केंद्रशासित प्रदेश बनला. त्यामुळे दमण आणि दीवही मुक्त झाले. ३० मे १९८७ रोजी पूर्ण राज्य घोषित करण्यात आले.

-अरुणाचल प्रदेश (१९८७): अरुणाचल प्रदेश १९७२ मध्ये केंद्रशासित प्रदेश बनला. १९८७ मध्ये ते पूर्ण राज्य बनवण्यात आले आणि इटानगरला त्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.

हे देखील वाचा- तिरंगा फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावे?

-मिझोरम (१९८७): २० फेब्रुवारी १९८७ रोजी मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. पूर्वी हा आसामचा जिल्हा होता. १९७२ मध्ये ते केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.

-छत्तीसगड (२०००): १ नोव्हेंबर २००० रोजी मध्य प्रदेशची पुनर्रचना करण्यात आली आणि छत्तीसगडचे वेगळे राज्य करण्यात आले.(States during formation of India)

-झारखंड (२०००): हा आदिवासीबहुल भाग १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारपासून वेगळा करून वेगळे राज्य बनवण्यात आले.

-उत्तराखंड (२०००): उत्तर उत्तर प्रदेशातील डोंगराळ प्रदेश एकत्र करून या राज्याची निर्मिती झाली.

-तेलंगणा (२०१४): हे देशातील २९ वे राज्य होते. आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांचे विलीनीकरण करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. २ जून २०१४ रोजी पूर्ण राज्य घोषित करण्यात आले.

-२०१९: जम्मू-काश्मीरमधून राज्याचा दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. यामध्ये लडाख वेगळे करून वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्यात आला.



Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.