देशात २०१६ मध्ये एकूण स्टार्टअपची संख्या एकूण ४७१ होती. पण आता ३० जून २०२२ पर्यंत मान्यता असलेल्या स्टार्टअपची संख्या वाढून ७२,९९३ झाली आहे. आकडेवारीनुसार तुम्हाला सहजपणे कळू शकते की, भारतासारख्या देशात स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात असून त्यात क्रांती होत आहे. जेव्हा एखादा स्टार्टअप सातत्याने यश मिळवतो तेव्हा कंपनीची वॅल्यूएशन वाढते. कंपनीच्या वॅल्यूएशनसह त्याला युनिकॉर्न, डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्नचा दर्जा दिला जातो. (Start Up in India)
कधी स्टार्टअप बनतो युनिकॉर्न
जेव्हा एखादी कंपनी लहान आयडियासोबत सुरु केली जाते आणि ती सातत्याने यश मिळवते. त्यानंतर अशी एक वेळ येते की, जेव्हा यश मिळवताना कंपनीची वॅल्यूएशन १ बिलियन म्हणजेच १ अरब डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक होते. अशातच स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा दिला जातो.
डेडकॉर्नचा दर्जा कधी
युनिकॉर्न नंतर एखादी कंपनी डेडकॉर्न पर्यंतचा प्रवास करते. नफा कमवताना एखादी कंपनी १० अरब डॉलरची वॅल्यूएशन मिळवते तेव्हा त्या कंपनीला डेडकॉर्नचा दर्जा दिला जातो. भारतात पेटीएम आणि बायजूस यांना डेडकॉर्नचा दर्जा मिळाला आहे.
हेक्टोकॉर्नचा दर्जा
जेव्हा १० अरब डॉलरचा टप्पा पार केल्यानंतर कोणतीही रंपनी १०० डॉलरचे वॅल्यूएशन मिळवते तेव्हा त्या कंपनीला हेक्टोकॉर्नचा दर्जा दिला जातो. चीनची Bytedance 400 अरब डॉलर वॅल्यूएशनसह जगातील सर्वाधिक स्टार्टअप कंपनी आहे. भारतात कोणत्याही कंपनीला हा दर्जा मिळालेला नाही. (Start Up in India)
हे देखील वाचा- RBI ची डिजिटल करेंसी नक्की काय आहे? ‘या’ पद्धतीने करणार काम
ही सुद्धा एक कॅटेगरी
या सर्वांव्यतिरिक्त आणखी एक कॅटेगरी म्हणजे सूनीकॉर्न. या कॅटेगरीत अशा कंपन्यांना ठेवले जाते जी लवकरच युनिकॉर्न बनण्याची क्षमता ठेवते आणि त्याची वॅल्यूएशन १ बिलियन डॉलरच्या पार पोहचण्याच्या मार्गावर असेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२२ चा रिपोर्ट जाहीर करण्यात आला. त्यानुसार यंदाच्या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात भारताने १४ युनिकॉर्न जोडले त्यांच्यासह मिळून युनिकॉर्नची संख्या ६८ झाली. पण फंडिंगच्या कारणास्तव आणि लेट-स्टेज करार क्रॅश झाल्याने भारतातील काही स्टार्टअप आपली युनिकॉर्न स्थिती गमावत आहे. फाइनेंशियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसार, काही तज्ञांनी असे म्हटले स्टार्ट अप संस्थापक बाजाराची प्रतिकूल परिस्थितीच्या कारणास्तव भांडवल एकत्रित करण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.