भारताचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीरला जाण्याची आणि या स्वर्गाचा अनुभव घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. आयुष्यात एकदातरी या काश्मीरमध्ये जावे आणि तिथल्या सौंदर्याला याची देही याची डोळा अनुभवावे अशी सर्वांची सुप्त इच्छा असते. काश्मीरचे सौंदर्य, डोंगर, नद्या, हिरवाई, थंडी आदी गोष्टींसोबतच काश्मीरची अजून एक एक मोठी ओळख म्हणजे येथे असलेले ट्युलिप गार्डन. काश्मीरला गेले आणि या गार्डनला भेट दिली नाही असे कधीच होत नाही.(Srinagar)
काश्मीरच्या सौंदर्यात भर टाकणारे हे गार्डन म्हणजे निव्वळ पृथ्वीवर पसरलेली फुलांची चादरच जणू. श्रीनगरमध्ये असलेले ट्युलिप फुलांचे (tulip garden) गार्डन हे आशिया खंडातील सर्वात मोठे गार्डन म्हणून ओळखले जाते. हे गार्डन आणि या गार्डनमधील मनमोहक ट्यूलिपची फुलं पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक श्रीनागमध्ये येतात. वर्षातले केवळ ३० दिवस अर्थात एक महिनाच हे गार्डन पर्यटकांसाठी खुले केले जाते. यंदा देखील हे गार्डन पर्यटकांसाठी लवकरच उघडण्यात येणार आहे. (Kashmir)
आशियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन, येत्या २६ मार्च २०२४ पासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहे. दरवर्षी मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातील हे गार्डन उघडले जाते. अतिशय सुंदर आणि आकर्षक असा ट्यूलिप महोत्सव बघण्यासाठी लाखो लोकं श्रीनगरमध्ये पोहचतात. श्रीनगरमधील प्रसिद्ध अशा दल सरोवराच्या काठावर हे गार्डन वसलेले असून, याचा समावेश जगातील सर्वात सुंदर बागांमध्ये केला जातो.(Top Trending News)
या ट्युलिप गार्डनबद्दल अधिक माहिती सांगायची झाली तर हे गार्डन आशिया खंडातील सर्वात मोठे गार्डन आहे. हे ट्युलिप गार्डन जवळपास ३० हेक्टर जागेमध्ये पसरलेले असून येथे आपल्याला १७ लाखांपेक्षा जास्त आणि ७५ पेक्षा अधिक विविध जातींचे ट्यूलिपचे फुलं पाहायला मिळतात. हे गार्डन दल सरोवराजवळ असल्याने इथूनच झबरवान टेकड्यांचे अतिशय सुंदर दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळते. चहूबाजूला बर्फाच्छादित डोंगर आणि शेजारी जगप्रसिद्ध दल लेक अशा अभूतपूर्व सौंदर्यामध्ये ही रंगबेरंगी अतिशय सुरेख फुलं आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतात. पर्यटक अक्षरशः या ट्युलिप फुलांच्या प्रेमात पडतात. ही फुलं त्यांचे रंग खर्च आपल्याला मोहून घेतल्याशिवाय राहत नाही. (Marathi Latest News)
==============
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
===============
दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ट्यूलिप महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात पर्यटकांसाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. ट्यूलिपसोबतच या गार्डनमध्ये डॅफोडिल्स, हायसिंथ्स, नार्सिसस आदी अनेक परदेशी फुलांच्या मोहक जाती या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या गार्डनची स्थापना जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००७ मध्ये येथील पर्यटन हंगाम वाढवण्यासाठी केली होती. पूर्वी येथील पर्यटन हंगाम फक्त उन्हाळा आणि हिवाळ्यापुरता मर्यादित होता.(Travelling)
जर तुम्ही आता उन्हाळ्यात जम्मू काश्मीरची ट्रिप प्लॅन करत आहात तर नक्कीच या ट्यूलिप गार्डनला भेट द्या. हे गार्डन सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असते. या गार्डनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकिट काढावे लागते. ज्याचे दर मोठ्यांसाठी ७५ रुपये तर मुलांसाठी ३० रुपये आहे. कदाचित हे तिकिटाचे दर अजून वेगळे देखील असू शकतात.