Home » श्रीरामाच्या भरोवशावर श्रीलंकेची अर्थव्यवस्था….

श्रीरामाच्या भरोवशावर श्रीलंकेची अर्थव्यवस्था….

by Team Gajawaja
0 comment
Economy
Share

श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Economy) संकटात सापडल्यावर तेथे निर्माण झालेली अस्थिरता अवघ्या जगानं बघितली होती. लाखो श्रीलंकेन नागरिक रस्त्यावर उतरले. या जनक्षोभापुढे सत्ताधारीही हतबल झाल्यासारखी परिस्थिती होती. जनक्षोभाला आवर घालण्यासाठी तिथे आणीबाणी लागू करण्यात आली. तरीही जनतेचा राग शांत झाला नाही. नागरिकांनी प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरांना लक्ष केलं. जाळपोळ केली, आपला राग व्यक्त केला. वर्षापूर्वी बिघडलेली आपल्या शेजारील देशाची अर्थव्यवस्था (Economy) अद्यापही रुळावर आली नाही. मात्र या सर्वात श्रीलंकेला दिलासा मिळाला आहे, तो राम नामातून. श्रीलंका आणि रामायण यांचा संबंध सर्वांनाच माहित आहे. रामायणात श्रीलंकेतील काही स्थळांचा उल्लेख आहे.  रावणानं माता सीतेचे अपहरण केले.  माता सीता यांच्या वास्तव्याच्या खूणा या भागात आजही आहेत. शिवाय रावणाचा महल, रामभक्त हनुमानाचे पाऊल अशा अनेक ठिकाणी भेट देण्यासाठी रामभक्तांची गर्दी श्रीलंकेत होते. अगदी श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती ढासळली असतांनाही रामभक्तांची या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी होत होती. हाच धागा पकडून आता श्रीलंकेमध्ये प्रभूरामाच्या भक्तांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून पर्यटन विकास हा उद्देश आहेच, शिवाय श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.  

श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Economy) आता प्रभू रामावर अवलंबून राहणार आहे. अर्थव्यवस्था (Economy) सुधारण्यासाठी आणि  उत्पन्न वाढवण्यासाठी लंकेच्या सरकारने रामायणाशी संबंधित ठिकाणे विकसित करण्यास सुरुवात केली आहे. भारतातून मोठ्या संख्येने रामभक्त श्रीलंकेतील रामायण स्थळाला भेट देण्यासाठी जातात. श्रीलंकेमध्ये सरकार विरोधात आंदोलन सुरु असतांनाही 2022 मध्ये सुमारे 7.2 लाख पर्यटक श्रीलंकेत आले होते.  मुख्य म्हणजे त्यापैकी 1.23 लाख पर्यटक भारतातील होते आणि या सर्वांमध्ये रामायणातील स्थळांना भेट देण्यासाठी भाविक अधिक होते. ही पर्यटकांची संख्या पाहून श्रीलंकेतील अर्थव्यवस्थेला (Economy) सावरण्यासाठी रामायणातील स्थळांचा अधिक व्यापक विकास करण्याची सुरुवात तेथील सरकारनं केली आहे. 

  गेल्या वर्षी श्रीलंकेला दिवाळखोर देश म्हणून घोषित करण्यात आले होते. यातून आता श्रीलंका सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीलंका टुरिझमचे प्रुमुख अधिकारी यासाठी रामायणातील धडे गिरवत आहेत. भारतातून मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष बोटींचीही सुविधा कऱण्यात येणार आहे. याशिवाय रामायणाशी संबंधित अशा 50 स्थळांची यादी करण्यात आली असून या स्थळांवर पर्यटकांना फिरवण्यासाठी वेगळी योजना केली आहे. याशिवाय या स्थळांच्या जाहीरातीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. कोरोना महामारीचाही श्रीलंकेतील अर्थव्यवस्थेला (Economy) मोठ्या प्रमाणात फटका बसला. श्रीलंकेतील समुद्र किनारे हे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र कोरोनाच्या काळात परदेशी पर्यटकांनी श्रीलंकेकडे पाठ फिरवली. शिवाय तेथे सुरु असलेल्या आंदोलनांनी देशात अशांत वातावरण होते. यात पर्यटकांची संख्या कमी झाली. या सर्वांवर मात करुन आता श्रीलंकेचा पर्यटन विभाग खास योजना करत आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला (Economy) हातभार लावणे आणि रोजगार उपलब्ध करुन देणे हा प्रमुख उद्देश आहे.  

श्रीलंकेच्या पर्यटन विभागानं रामायणाशी संबंधित अशा 50 स्थळांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मंदोदरी महल, रावणाचा महल, अशोक वाटीका, हनुमानाचे पाऊल आदी स्थळांचा प्रामुख्यानं समावेश आहे. श्रीलंकेतील या मंदोदरी महालाच्या चारी बाजूला धबधबे आणि घनदाट जंगल आहे.  याला स्थानिक भाषेत ‘सीता कोटुवा’ म्हणजेच सीतेचा किल्ला म्हटले जाते. याच परिसरातील पाण्याच्या झ-याच्या आसपासच्या दगडांवर भले मोठे पायांचे निशाण आढळून येतात.  हे निशाण हनुमानाचे असल्याचे सांगितले जाते. येथे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे मंदिर आहे. हे पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी होती.  

=========

हे देखील वाचा : काय सांगता! चक्क १०२ बायका आणि ५७८ मुलं एकाच व्यक्तीची?

=========

श्रीलंकेमध्ये सीता मातेच्या अश्रूंनी तयार झालेल्या तलावाला बघण्यासाठीही भाविकांची गर्दी होते. रावणाने माता सीतेचे हरण करून लंकेमध्ये प्रवेश केला त्या रस्त्यावर कोणतेही झाड अथवा साधे रोपटे देखील नाही. याच मार्गावर हा सीता तलाव आहे. माता सीतेच्या अश्रूंनी या तलावाची निर्मिती झाली असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे,  भर उन्हाळ्यात आसपासच्या मोठ्या नद्या कोरड्या पडतात पण हा तलाव मात्र कधीही आटत नाही. या सीता तलावाच्या आसपास खास फुले आढळतात. या फुलांना सीता फुले म्हणतात. या फुलांना अगदी जवळून पाहिल्यास कोणीतरी व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा असल्याचा भास होतो, असे सांगतात.श्रीलंकेतील पुरातत्व विभागाला तेथील काही भागात भल्या मोठ्या हत्तींचेही अवशेष सापडले आहेत.  हे अवशेषही रामायण काळातील असल्याचे सांगण्यात येते. अशीच अनेक स्थळे आता श्रीलंकेच्या पर्यटन विभागानं विकसित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.  प्रभू रामाच्या भक्तांनी या स्थळांना भेट द्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.