गेली काही वर्ष कर्जबाजारी झालेल्या श्रीलंकेनं आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामध्ये श्रीलंकेतील माकडांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या श्रीलंकेनं चीनला आपल्याकडची लाखभर माकडं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चीननं दिलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली श्रीलंका पूर्णपणे बुडीत निघाला आहे. त्यातून सावरण्यासाठी श्रीलंकेनं हा उपाय शोधला आहे. श्रीलंकेत मुळात माकडांच्या तीन प्रजाती आढळतात. त्यापैकी टोटे मकाक ही स्थानिक प्रजाती आहे. या माकडांची सध्या संख्या जास्त झाल्याचे कारण पुढे करत श्रीलंकेनं चीनला माकडे पाठवण्याचे निश्चित केले आहेत. ही एक लाख माकडे चीनच्या अभयारण्यात ठेवण्यात येणार आहेत. या माकडांनी श्रीलंकेतील भातशेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांची वाढती संख्या रोकणे गरजेचे होते, त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे श्रीलंकन सरकार सांगत असले तरी प्राणीमित्रांनी त्याला विरोध केला आहे. त्यांच्या मते चीन या माकडांचा उपयोग चाचणी प्रयोगशाळांमध्ये करणार आहे. या माकडांवर औषधांच्या निर्मितीपूर्वी प्रयोग करण्यात येणार आहेत. त्यामुळे या माकडांचीच प्रजाती धोक्यात येऊ शकते असा इशारा प्राणीमित्र संघटनेनं दिली आहे.
श्रीलंकेमधील टोटे मकाक माकड हे मुळ मानले जाते. माकडाची ही प्रजाती श्रीलंकेत संरक्षित नसली तरीही इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय म्हणून या माकडांच्या प्रजातीचा उल्लेख आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांची निर्यात झाल्यास ही प्रजाती भविष्यात संपुष्टात येण्याची भीती प्राणीमित्रांना पडली आहे. यासाठी श्रीलंका पर्यावरण संस्थेने या एक लाख माकडांना चिनमधील प्रयोगशाळांत फक्त प्रयोग करण्याचे साधन म्हणून बघण्यात येईल, असा धोका सांगितला आहे.
सध्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना श्रीलंका करीत आहे. यासाठी काही विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. याअंतर्गत श्रीलंका इथून टोके मकाक ही माकडांची खास प्रजाती चीनला पाठवण्यात येणार आहे. यावर श्रीलंकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या प्रमुखाने धोक्याचा इशारा दिला आहे. वास्तविक, टोटे मकाक माकड ही श्रीलंकेची स्थानिक प्रजाती आहे. माकडाची ही प्रजाती श्रीलंकेत संरक्षित नसली तरीही इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) च्या रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय म्हणून त्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांची निर्यात होण्याची भीती पर्यावरणप्रेमींना सतावत आहे. ही 1 लाख माकडांची पहिली तुकडी चीनमधील प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी नेली जाऊ शकते. या माकडांचा उपयोग कॉस्मेटिक उत्पादने आणि वैद्यकीय प्रयोगांच्या चाचणीसाठी केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र सरकारनं हा दावा फेटाळून लावला आहे, सरकारी पत्रकानुसार, श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात टोके मकाक माकडे आहेत, ही प्रजाती चीनमध्ये मोठ्याप्रमाणात नाही, त्यामुळे तेथील जंगलामध्ये या माकडांची संख्या वाढवण्यासाठीच चीननं या माकडांची मागणी केली होती, त्यानुसार टोके मकाक माकडे पाठवण्यात येणार आहेत. या माकडांबरोबरच श्रीलंकेतील मोरही चीनला पाठवण्याचा प्रस्ताव सरकारतर्फे करण्यात आला होता. मोर हे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे म्हणण्यात आले होते. मात्र या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानं तो मागे घेण्यात आला होता.
=======
हे देखील वाचा : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ड्राइविंग लाइयसन्स असे करा ट्रांसफर
=======
चीनमध्ये पाठवली जाणारी ही टोटे मकास माकडेही पिक नष्ट करण्यासाठी ओळखली जातात. श्रीलंकेतील स्थानिक शेतकरी या माकडांच्या मोठ्या टोळ्यांनी त्रस्त झाले आहेत. या माकडाच्या मोठ्या टोळ्या असतात आणि ही टोळी एकाचवेळी पिके तयार झाल्यावर हल्ला करते. त्यामुळे पिके नष्ट होत आहेत. श्रीलंकेतील अधिकार्यांचा अंदाज आहे की देशातील माकडांची संख्या तीस लाखांच्या दरम्यान आहे. ही संख्या येत्या काही वर्षात दुप्पट होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडून होणा-या नुकसानीचे प्रमाणही वाढू शकते. याला वेळीच अटकाव करण्यासाठी या माकडांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे अधिका-यांचे मत आहे. याचवेळी चीनकडून या माकडांची मागणी झाल्यानं चीनला माकडे पाठवण्याची तयारी सुरु केल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले. श्रीलंकेत माकडांच्या एकूण तीन प्रजाती आढळतात. टफ्टेड ग्रे लंगूर आणि जांभळ्या चेह-याचे माकड आणि टोके मकाक अशा तीन प्रजाती आहेत. त्यातील टोके मकाक हे स्थानिक प्रजाती असल्याचे सांगण्यात येते.
सई बने..