नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन पुन्हा एकदा अमेरिका आणि साउथ कोरियासाठी अडळला बनून उभा राहिला आहे. या हुकूमशाहाने अधिकाऱ्यांना आपल्या पहिल्या स्पाय सॅटेलाइटला (Spy satellite) लॉन्च करण्याचे आदेश दिले आहेत. याची पुष्टी नॉर्थ कोरियाच्या एका न्यूज एजेंसीने केली आहे. एजेंसीने स्पाय सॅटेलाइटला नॉर्त कोरियासाठी देशातील सैन्याची क्षमता वाढवणे आणि अमेरिका, साउथ कोरियापासून होणाऱ्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी हे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
खरंतर किमने असे सांगितले की, नॉर्थ कोरियाने आपला पहिला मिलिट्री सॅटेलाइट तयार केले आहे. याच्या लॉन्चिंगसाठी सुद्धा हिरवा कंदिल दाखवला गेला आहे. खरंतर हे पूर्ण झाल्याचा रिपोर्ट प्योंगयांगने सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर दोन आठवड्यांनी आला आहे. या रिपोर्टमध्ये असे ही म्हटले गेले आहे की, हे एक नवे बॅलेस्टिक क्षेपणस्र आहे.
मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीत आयसीबीएम आणि आंतराळ लॉन्च क्षमतांच्या विकासादरम्यान महत्वपूर्ण तांत्रिक ओवरलॅप आहे. केसीएनएच्या नुसार, किमने नुकतेच असे निर्देशन दिले आहेत की, एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या मिलिट्री स्पाय सॅटेलाइट क्रमांक-१ ठरवलेल्या काळात लॉन्च केला जाईल.या व्यतिरिक्त उत्तर कोरियाच्या नॅशनल एयरोस्पेस डेवलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या दौऱ्यावर हुकूमशाह किमने स्पाय सॅटेलाइटच्या माध्यमातून गुप्त माहिती एकत्रित करण्याची क्षमता अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत आपल्या मुलीसह किंमचे आंतराळ एजेंसीच्या दौऱ्यावेळचे फोटो सुद्धा समोर आले होते. त्यामध्ये तो त्याची पाहणी करत होता. पण ते फोटो अंधुक दिसत होते.
चॅन-इल, उत्तर कोरिया अभ्यासासाठी वर्ल्ड इन्स्टिट्यूट चालवणारे डिफेक्टर-टर्न-संशोधक यांच्या मते, असे दिसते आहे की उत्तर कोरिया आता आपला प्रतीकात्मक उपग्रह प्रक्षेपित करेल आणि नंतर हळूहळू तो अपग्रेड करेल. चीन आणि रशियाने यामध्ये उच्च तंत्रज्ञानाची मदत न दिल्यास उत्तर कोरियाला स्वतःच्या तंत्रज्ञानाने हेरणे कठीण होईल, असे ते म्हणाले.(Spy satellite)
हे देखील वाचा- ईराणी राष्ट्रापतींची इज्राइलला धमकी, अवीवला नष्ट करण्याचा दिला इशारा
दरम्यान, याआधी नॉर्थ कोरियाने डिसेंबर महिन्यात स्पाय सॅटेलाइचे परिक्षण केले होते. त्यानंतरच नॉर्थ कोरियाच्या दोन मिडल रेंजचे क्षेपणस्र लॉन्च केले गेले. याची पुष्टी दक्षिण कोरिया आणि जापानने केली होती. त्या वेळी नॉर्थ कोरियाने दक्षिण कोरियाची राजधानी सियोल आणि आसपासच्या बंदरांजवळील शहर इंचियोन येथून मिसाइलच्या लॉन्चिंग संबंधिक कमी रेजॉल्यूशन असणारा फोटो सुद्धा जारी केला होता. तो फोटो लॉन्चिंग दरम्यान घेण्यात आला होता. तसेच नॉर्थन कोरियाने नुकत्याच एक नवी सॉलिड फ्यूल असणारी इंटरकॉन्टिंनेंटल बॅलेस्टिक मिसाइल लॉन्च केली होती. त्यानंतरच नॉर्थ कोरियाने आंतराळ विकास एजेंसीचा दौरा केला होता.