Home » Spy Balloon चा पहिल्यांदा कधी वापर करण्यात आला होता? ‘या’ कामासाठी केला जातो वापर

Spy Balloon चा पहिल्यांदा कधी वापर करण्यात आला होता? ‘या’ कामासाठी केला जातो वापर

by Team Gajawaja
0 comment
Spy Balloon
Share

आधुनिकतेच्या शिखराकडे वाटचाल करणारे हे जग दिवसेंदिवस नवीन काहीतरी करत आहे. या जगातील प्रत्येक देश आपल्याला अधिक प्रगत करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात बदल घडवून आणत आहेत. परंतु आधुनिकेच्या जगात एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा फार महत्वाची आहे. आपल्याला सर्वसामान्य फुगा आणि हॉट एअर बलून बद्दल माहिती असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का, हॉट एअर बलूनला गुप्तहेर आणि वातावरणाच्या माहितीसाठी सुद्धा वापरले जाते. गुप्तहेरच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या फुग्याला गुढ फुगा असे ही म्हटले जाते.(Spy Balloon)

गुढ फुगा म्हणजे काय?
गुढ फुग्याचा एक आपला जुना इतिहास आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये आज सॅटेलाइज एज मध्ये ही या गुढ फुग्याचा वापर केला जातो. कोलोराडो बोल्डर युनिव्हर्सिटीमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंग सायन्सचे प्रोफेसर इयान बॉयड यांनी द कन्वर्सेशन न्यूज साइटला असे सांगितले की, हे फुगे वजनाने अगदी हलके असतात. यामध्ये हीलियम गॅसचा वापर केला जातो.

हे गुढ फुगे सुसज्ज असतात. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे लावले जाता. जमिनीवरुन त्यांच्यावर लक्ष ठेवणे फार आव्हानात्मक आणि मुश्किल काम असते. कारण ते जमिनीच्या पृष्ठभागावरुन खुप उंचावर उडू शकतात. त्यामुळे त्याचा वापर वातावरणासंबंधित माहिती जमा करण्यासाठी सुद्धा केला जातो.

वॉशिंग्टन डीसी मध्ये नॅशनल डिफेंस युनिव्हर्सिटीत नियर ईस्ट साउथ एशिया सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे प्रोफेसर डेविड डेरोचेस यांच्या मते, गुढ फुगे इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल्स एकत्रित कऱणे आणि कम्युनिकेशन बाधीत करण्यास सक्षम असू शकतात.

हे देखील वाचा- युक्रेन-रशियानंतर आता ‘या’ दोन देशामध्ये होणार युद्ध?

पहिल्यांदा कधी करण्यात आला होता वापर
१८०० च्या दशकात गुढ फुग्यांचा वापर सुरु झाला होता. फ्रांन्सने १८५९ मध्ये फ्रेंको-ऑस्ट्रियाच्या युद्धावर नजर ठेवण्यासाठी Crew सह फुग्यांचा वापर केला गेला. त्यानंतर १८६१ ते १८६५ दरम्यान, US Civil War दरम्यान या फुग्यांचा वापर पुन्हा केला गेला. तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावेळी Spy Balloon म्हणजेच गुढ फुगा हा सामान्य झाला. (Spy Balloon)

दरम्यान, सध्या गेल्या काही दिवसांपासून कथित रुपात लक्ष ठेवण्यासाठी चीनकडून वापरण्यात आलेल्या गुढ फुग्यामुळे अमेरिका आणि चीन मधील नात्यात तणाव निर्माण झाला आहे. याच दरम्यान, युएसचे राष्ट्रपती जो बिडेन यांनी असे म्हटले होते की, चीनचा गुढ फुगा पाडण्याबद्दल मतभेद जरुर आहेत. मात्र अमेरिकेला या मुद्द्यावर चीन सोबत कोणताही वाद नकोय. गुढ फुगा पाडल्यानंतर चीनने तो सिविल बलून असल्याचे सांगत अमेरिकेला इशारा दिला होता. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने असे म्हटले होते की, अमेरिका मुद्दाम हा मुद्दा चढवून सादर करत आहेत. तर अमेरिकेने हा गुढ फुगा गुप्त माहिती एकत्रित करण्यासाठी चीनने वापरल्याचा आरोप लावला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.