स्पिरुलिना हे एक प्रकारचे निळ्या-हिरव्या रंगाचे शेवाळ आहे. यामध्ये भरपूर पोषक तत्वांसह बी विटामीन, बीटा कॅरेटिन आणि विटामीन ई चा समावेश आहे. स्पिरुलिना हे शाकाहारी प्रोटीनचे उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. याचे अन्य काही आरोग्यदायी फायदे असल्याचे सिद्धांताने सिद्ध झाले आहे. स्पिरुलिना (Spirulina) जगतील सर्वाधिक लोकप्रिय सप्लीमेंट्सपैकी एक आहे. त्यामध्ये विविध पोषक तत्वे आणि अँन्टीऑक्सिडेंट आढळतात, जे तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊयात स्पिरुलिनाच्या फायद्यासह नुकसानाबद्दल अधिक.
स्पिरुलिना नक्की काय आहे?
स्पिरुलिना हे एक निळ्या-हिरव्या रंगाचे शेवाळ आहे. असे मानले जाते की, पृथ्वीवरील सर्वाधिक जुने शेवाळ आहे. स्पिरुलिना हे एक सुपरफुड असल्याचे सांगितले जाते. आधुनिक शोध स्पिरुलिनाचे सेवन करण्यासंदर्भात आरोग्यदायी फायदे आणि त्याबद्दल समस्यांवर उपचारकारक असण्यासंदर्भात अभ्यास सुरु आहे.स्पिरुलिना हे तुम्हाला सहज ज्या ठिकाणी काढा, वनऔधषी मिळतात तेथे उपलब्ध होईल. स्पिरुलिना मध्ये अँन्टिऑक्सिडेंट, खनिज, क्लोरोफिल आणि फाइकोसाइनिनचा समावेश आहे. स्पिरुलिना मध्ये मॅग्नेशियम सुद्धा आढळते. हे खनिज शरिरातील पेशी आणि हृदयाचे ठोके सामान्य स्तरावर ठेवण्यास मदत करते.
हे देखील वाचा- Alert: १८ वर्षांनंतर समोर आले दुर्मिळ ‘मंकीपॉक्स इन्फेक्शन’चे प्रकरण, सविस्तर जाणून घ्या त्याची लक्षणे आणि कारणे
स्पिरुलिनाचे फायदे
स्पिरुलिना हे पोषक तत्वांनी संपन्न आहेच. पण हे एक वनस्पती आधारित प्रोटीन आहे. ज्याला फाइकोसाइनिन असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त अँन्टीऑक्सिडेंट, दुखण्यापासून दिलासा, अँन्टी-इंफ्लेमेटरी आणि ब्रेन प्रोटेक्टिव्ह गुण असू शकतात. त्यामुळे जाणून घ्या स्पिरुलिनाचे (Spirulina) आरोग्यदायी फायदे.
-वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक हे त्यासंदर्भातील डाएट करतात. अशातच स्पिरुलिना तुम्हाला वजन करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. कारण भरपूर प्रमाणात असलेले पोषक तत्व, कमी कॅलेरीज असल्याने तुम्हाला अधिक फायदा होतो. तुमच्या आहारात स्पिरुलिनाचा वापर केल्यास कालांतराने तुम्हाला वजन कमी होत असल्याचे जाणवेल.
-डायबिटीज नियंत्रणात राहते
न्यूट्रिशन रिसर्च अॅन्ड प्रॅक्टिसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले की. स्पिरुलिना टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये इंन्सुलिन संवेदनशीलता आणि एकूण कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करु शकतो. म्हणजेच डायबिटीज नियंत्रणात राहण्यासाठी हे फायदेशीर ठरु शकते.
हे देखील वाचा- कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो का? जाणून घ्या अभ्यासात काय आढळले
-मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत करते
स्पिरुलिनाचे सेवन केल्याने व्यक्तीच्या शरिरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. उच्च मेटाबॉलिज्म रेट असलेल्या व्यक्तीला जाणवते की, त्याच्याकडे अधिक उर्जा आहे.. त्यांच्या द्वारे प्रतिदिन बर्न केली जाणारी कॅलरीची संख्या ही वाढू शकते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
स्पिरुलिना आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण काहींना यापासून अॅलर्जी ही होऊ शकते. खासकरुन अशी लोक ज्यांना समुद्रातील शैवाळ, मासे किंवा समुद्रात येणाऱ्या भाज्या ज्यामुळे त्यांना अॅलर्जी होते. कारण स्पिरुलिना रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते असे मानले जात असल्याने, मल्टिपल स्क्लेरोसिस, संधिवात किंवा ल्युपस यांसारख्या ऑटोइम्यून रोग असलेल्या लोकांनी ते टाळले पाहिजे. तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल किंवा प्रेग्नंसीचा विचार करत असाल तर स्पिरुलिना वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.