भारतीय धर्म आणि संस्कृतित नारळाला फार मोठे महत्व आहे. त्यामुळेच मंदिरात नारळ फोडणे किंवा देवाला अर्पण करणे शुभ मानले जाते. नारळाला ‘श्रीफळ’ असे ही म्हटले जाते. नारळाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण राहते असे मानतात. त्यामुळेच हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. नारळ फोडणे हे शुभ कार्याची निशाणी मानली जाते. अशातच आपण बहुतांशवेळा पाहतो की, नारळ हे पुरुष मंडळी फोडतात. परंतु लोक मान्यतांनुसार, महिलांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. पण असे का असावे? यामागील मान्यता नक्की काय आहे याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Spiritual)
-धार्मिक मान्यतांनुसार नारळ हा केवळ पवित्रच नसून त्याला एका बीजाच्या रुपात ही ओळखले जाते. हिंदू धर्मात बीज म्हणजेच मुलासमान मानले गेले आहे. अशातच एखादी आई ही आपल्या मुलावर खुप प्रेम करते आणि त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख देण्यापासून दूर ठेवते.
-त्यामुळे असे ही मानले जाते की, बीजाच्या रुपात नारळ फोडणे म्हणजेच आपल्या मुलाला वेदना देण्यासारखे आहे. म्हणूनच महिलांकडून नारळ कधीच फोडला जात नाही. याचा अर्थ असा होतो की, मुलाला कष्ट देण्यासारखे आहे.
-या व्यतिरिक्त असे ही मानतात की, महिलांनी जर नारळ फोडल्यास आपल्या मुलावर अधिक संकट येऊ शकतात. मुलाच्या आयुष्यात कोणती ना कोणती समस्या वारंवार येत राहते. त्याचे आयुष्य त्याच गोष्टींनी भरले जाते. मुलाला यश मिळण्यास ही समस्या येतात.
-नारळाला बीज असे मानले जाते तर महिला नारळ फोडू शकत नाही. पण पुरुष मंडळी फोडू शकतात? तेव्हा त्यांचे मुलांवर प्रेम नसते का असा ही तर्क काही वेळा लावला जातो.
-वडिलांना ही आपल्या मुलावर आईप्रमाणेच प्रेम असते. फरक ऐवढाच असतो की, आई खुप प्रेम वेळोवेळी व्यक्त करते पण वडिल भावना खुल्या पद्धतीने वेळोवेळी करताना जास्त दिसून येत नाही. परंतु याचा ही अर्थ असा नव्हे त्यांना आपल्या मुलावर प्रेम नाही.(Spiritual)
हे देखील वाचा- कपाळाला टिळा का लावला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि नियम
-महिलांनी नारळ न फोडण्यामागील हे कारण थोड विचित्र आहे. परंतु शास्रात या बद्दल ही ठोसपणे सांगण्यात आलेले नाही. पण लोक मान्यतेच्या आधारावर तसे करतात.