Home » घरात अशाप्रकारे ठेवा शंख, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

घरात अशाप्रकारे ठेवा शंख, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मात शंखाचे फार महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक अनुष्ठान किंवा पूजा करण्याआधी शंखनाद केला जातो. बहुतांशजण आपल्या घरी देव्हाऱ्यात शंख ठेवतात.

by Team Gajawaja
0 comment
Spiritual Tips
Share

Spiritual Tips : घरी पूजा-प्रार्थनेसाठी बहुतांशजण शंखाचा वापर करतात. शंख अत्यंत शुभ मानला जातो. कोणतेही धार्मिक काम करण्याआधी शंखनाद केला जातो. शंखनादाशिवाय कोणताही पूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. शास्रानुसार, घरात किती शंख ठेवले पाहिजेत, एकापेक्षा अधिक शंख ठेवावेत का, कोणता शंख पूजेसाठी वापरणे शुभ असते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सविस्तर….

किती शंख असावेत?
शास्रानुसार, घराच्या देव्हाऱ्यात किंवा पूजेच्या ठिकाणी एकच शंख असावा. दुसरा शंख पूजेवेळी शंखनाद करण्यासाठी असावा. पण हा शंख देव्हाऱ्यात ठेवू नये. कारण शंखनाद करताना आपण त्याला तोंड लावतो. यामुळे देव्हाऱ्यात असा शंख ठेवू नये. घरात तुम्ही दोन शंख ठेवू शकता.

वास्तु दोषापासून बचाव करण्यासाठी उपाय
पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या शंखात रात्रीच्या वेळी पाणी भरून ठेवावे. सकाळी हेच पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. असे मानले जाते की, असे केल्याने वास्तु दोषांपासून मुक्तता मिळते.

Pooja Sound God Shankh Conch Shell 4.5inch With 5.5 Brass Stand Hindu  Worship Crysta Polished Conch Shell White Shankha i-5973 - Etsy Ireland

या शंखाने घरात करा पूजा
धार्मिक मान्यतांनुसार, पूजेसाठी दक्षिणावर्ती शंखाचा वापर केला पाहिजे. असे मानले जाते की, दक्षिणावर्ती शंख साक्षात देवी लक्ष्मीचे रुप असते. पूजेसाठी अशा शंखाचा वापर केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. यामुळे घरात सुख-शांती नेहमीच टिकून राहते. (Spiritual Tips)

लाल रंगाच्या कापडात ठेवा शंख
धार्मिक मान्यतांनुसार, ज्या शंखाची पूजा तुम्ही करता त्यावर बाहेरील व्यक्तींची नजर पडू देऊ नका. यामुळे शंख लाल रंगाचा कापडात ठेवा. असे मानले जाते की,असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाची कधीच कमतरता भासत नाही.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा :
मोनालिसाच्या चित्रात अनेक गुढ संदेश असल्याची चर्चा
वादाचा कारण ठरली ‘मिस जपान’ ही स्पर्धा…
चुकून मोबाइलमधील क्रमांक डिलिट झालेत? बॅकअपसाठी वापरा ही ट्रिक

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.