हिंदू धर्मात झाडांचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार असे मानले जाते की, झाडांमध्ये देवी-देवतांचा वास असतो. सनातन धर्मात केवळ झाडच नव्हे तर त्यासंबंधित पाने, मूळ, बिया आणि फुलांचे विशेष महत्त्व असते. झाडांशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही अत्यंत पवित्र मानली जाते. याच कारणास्तव झाडांची देखील पूजा केली जाते. (Spiritual)
धार्मिक मान्यतांनुसार, पिंपळ, कडुलिंब, चिंच, तुळस अथवा आंब्याचे वृक्ष लावणे अत्यंत शुभ मानले जाते. याच कारणास्तव पूजेदरम्यान पुढील काही पानांना पवित्र मानले जाते. ही पाने देवाच्या पूजेसाठीही वापरली जातात.
तुळशीचे पान
सनातन धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. तुळशीला तुलसी मातेचा दर्जा दिला आहे. तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असते. धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, एखाद्याच्या घरी तुळशीचे रोप असल्यास तेथे कोणत्याही प्रकारचे दु:ख, कष्ट आमि समस्या दूर होतात.
याशिवाय हिंदू धर्मात जल पवित्र करण्यासाठी त्यामध्ये तुळशीचे पान टाकले जाते. घरात तुळशीचे रोप असल्यास ते सुकू देऊ नका. जर सुकले असल्यास तर लगेच नवे रोप आणून लावावे.
आंब्याचे पान
सनातन धर्मात कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावेळी दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. याशिवाय तांब्याच्या कलशावरही आंब्याची पानं ठेवली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, आंब्याच्या पानांमुळे नकारात्मक उर्जा दूर होऊन सकारात्मक उर्जा येतात. यामुळे शुभ कार्य करताना आंब्याची पाने वापरली जातात.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाच्या पानात औषधीय गुण असतात. कडुलिंबाला देवी दुर्गेचे रूप मानले जाते. काही ठिकाणी या झाडाला निमारी देवी असेही म्हटले जाते. मंगळ दोष दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने वापरली जातात. कारण कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो.
केळ्याची पाने
काही प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये केळ्याच्या पानांचा वापर केला जातो. केळ्याच्या झाडाबद्दल असे मानले जाते की, या झाडामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असतो.
भगवान विष्णूच्या पूजेसाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो. केळीच्या पानांशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण आहे. एवढेच नव्हे तर दक्षिण भारतात या पानांना फार पवित्र मानले जाते.
शमीची पाने
शमीची पाने भगवान शंकरासाठी प्रिय असतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकराचे पान शंकराला अर्पण केल्यास शुभ फळ मिळते. भगवान शंकराशिवाय शमीची पाने शनिदेवालाही अर्पण केली जातात. घरात शमीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. (Spiritual)
बेलाचे पान
हिंदू धर्मात बेलपत्राला फार पवित्र मानले जाते. बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले जाते. बेलपत्र शंकराला अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असे मानले जाते.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)
आणखी वाचा: Vastu Tips For Home: घरात कुबेर यंत्र ठेवताय? या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा….