रशिया-युक्रेन मधील युद्ध सुरु होऊन १० महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशातच युद्ध काही संपण्याचे नावच घेत नाही आहे. दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात मृत्यूमुखी झालेल्या सैनिकांची संख्या सुद्धा खुप आहे. जवळजवळ १ लाख सैनिक आणि ४० हजार सामान्य नागरिक हे दोन्ही देशांमधील ठार झाले आहेत. तरीही दोन्ही देश आपले रणनिती संबंधित हालचाली, विशेष करुन युक्रेनला दिल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या मदतीसंदर्भात अधिक चर्चा होते. रशिया सुद्धा आपल्या देशातील सैनिकांना मोठ्या प्रमाणात युद्धात उतरवत आहे. याच पार्श्वभूमीवर रशिया आता आपल्या सैनिकांना मोफत स्पर्म फ्रीज करण्याची सुद्धा सुविधा देत आहे.(Sperm Freeze Facility)
खुप पैसा ओतला जातोय
नुकत्याच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांनी अमेरिकेचा दौरा केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. यामुळे रशियाला ते काही पटले नाही. बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेने आता पर्यंत या युद्धात ६७ अरब डॉलरपेक्षा अधिक रक्कम देऊ केली आहे. वर्ष २०२३ मध्ये ४५ अरब डॉलर असण्याची शक्यता आहे. याच्या उत्तरात रशिया नक्की काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सैनिकांच्या तैनाती आणि स्पर्म फ्रीज
रशियन सरकरार मेडिकल इंन्शुरन्सच्या नियमात बदल करुन स्पर्म फ्रीज करण्याची सुविधा मोफत मध्ये देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियातील न्यूज एजेंसी तास यांच्या मते, रशियन वकिलांच्या संघाचे प्रमुख आइगोर ट्रुनोव यांनी असे सांगितले की, आरोग्य विभागाने त्यांच्या फ्री क्रायोबँक आणि महत्वाच्या मेडिकल इंन्शुरन्स मध्ये बदलावासंबंधित अपील मान्य केली आहे.
नक्की काय आहे कारण?
खरंतर असे तेव्हा होते जेव्हा रशियन जोडप्यांमधील पुरुष मंडळींना सैन्यात जाण्याचे आदेश मिळतात. त्याचसोबत रशियन महिलांना सुद्धा वाटते त्यांचा पार्टनरने सैन्यात आणि युद्धात जावे. त्यापूर्वी त्यांचे स्पर्म संरक्षित केले जाईल जेणेकरुन जर त्या व्यक्तीचे युद्धात काही झाले तर मुलं जन्माला घालण्यास कोणतीही समस्या येणार नाही. त्यामुळेच ट्रुनोव यांनी ट्विटरवर आवाहन केले होते की, त्यांच्या युनियनने अशा काही जोडप्यांच्या वतीने याचिका दाखल केली होती ज्यामध्ये नवऱ्याला विशेष सैन्याच्या अभियानात हिस्सा घेण्याचा आदेश मिळाला आहे. (Sperm Freeze Facility)
स्पर्म फ्रीज करण्याचा प्रयत्न वाढतोय
रशियन सरकारकडून आता पर्यंत याच्या बद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही. रशियाच्या आरोग्य विभागाने सुद्धा ट्रुनोव यांच्या विधानावर काहीही म्हटलेले नाही. तर ट्रुनोव यांच्या मते, त्यांची युनियन या संबंधित अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सैन्यात जाण्याच्या आदेशानंतर पुरुषांचे स्पर्म फ्रीज करण्याच्या घटनांमध्ये फार मोठी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा- Genome Sequencing म्हणजे काय?
आव्हानात्मक ठरु शकते
रशियात स्पर्म फ्रीज करणे सोप्पे नव्हे. या संबंधित क्लिनिक सुद्धा फार कमी आहेत. अशातच अधिक संख्येने स्पर्म फ्रीज करण्याची मागणी वाढल्यास आणि जर फ्री मध्ये सरकारकडून स्पर्म फ्रीज करण्याची सुविधा मोफत असेल तर एक आव्हानात्मक ठरु शकते. त्यामुळे अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, रशियन सरकार या गोष्टीला कसे हाताळणार आहे.