बॉलिवूड मधील सिनेमा विक्की डोनर हा आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्यामध्ये एक व्यक्ती आपले स्पर्म डोनेट करतो. त्याच्या मोबदल्यात पैसे घेतो आणि खुप श्रीमंत होतो. मात्र असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियात समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील एका स्पर्म डोनरने आपल्या बनावट नावांचा वापर करत स्पर्म डोनेट करत ६० मुलांचा बाबा झाला आहे. ही गोष्ट अशावेळी उघडकीस आली जेव्ह नव्या पालकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा त्यांची मुलं ही एकसमान दिसत होती. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यात आलेले नाही. पण त्याने चार वेगवेगळ्या नावांनी एलजीबीटीक्यू समुदायाला आपले स्पर्म डोनेट केले. (Sperm Donor)
स्पर्म डोनरचे ग्राहक नव्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भेटले असता त्यांना हैराण करणारी गोष्ट दिसली. यावेळी त्यांची मुलं ही एकसमान दिसत होती. यानंतर या प्रकरणाची अधिक तपासणी केली असता देशातील विविध भागात आयवीएफ क्लिनिक्सच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या बद्दल अधिक माहिती शोधून काढण्यात आली.
खुप वेळा स्पर्म डोनेट केलेय
सिडनी मधील फर्टिलिटी फस्ट्रच्या डॉक्टर एनी क्लर्क यांनी असे सांगितले की, त्या व्यक्तीने आमच्या क्लिनिकमध्ये एकाच स्पर्म डोनेट केले होत. त्याने दावा केला होता की, फेसबुक वरील ग्रुपच्या माध्यमातून काही वेळा स्पर्म डोनेट केले आहेत. तर त्याला अटक करण्यामागील कारण असे होते की, तो काकेशियन म्हणजेच मूळ युरोपिय स्थानिक नव्हता.
बेकायदेशीर आहे भेटवस्तू घेणे
बहुतांश देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियात ही मानव स्पर्मच्या बदल्यात भेटवस्तू घेणे हे ह्युमन टिश्यू अॅक्ट अंतर्गत गुन्हा आहे. त्यासाठी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्ममुळे पालक आणि डोनर्स हे मिळत असल्याने अनौपचारिक डोनेशनची प्रकरणे वाढत आहेत. (Sperm Donor)
हे देखील वाचा- पुरातत्ववाद्यांनी शोधून काढला ५०० वर्ष जुना बार
युके मध्ये सुद्धा नियम
युके मध्ये ह्युमन फर्टिलाइजेशन अॅन्ड एब्रेयोलॉजी अथॉरिटीनुसार, स्पर्म डोनर्स द्वारे डोनेशनसाठी कोणत्याही प्रकारचे पेमेंट करणे बेकायदेशीर आहे. जर एखादा डोनर आपली प्रत्येक क्लिनिकल विजिटसाठी कमीत कमी ३५ पाउंड रक्कम मिळवू शकतो. प्राधिकरणाद्वारे हे सुद्ध अनिवार्य करण्यात आले आहे की, एका व्यक्तीचे स्पर्म कमीत कमी १० परिवारांना दिले जाऊ शकते. दरम्यान, किती मुलं झाली पाहिजेत यावर परिवारांना बंदी नाही.