Home » Ram Mandir स्वप्नपूर्तीची एकवर्ष : जाणून घ्या अयोध्या राममंदिराबद्दल खास माहिती

Ram Mandir स्वप्नपूर्तीची एकवर्ष : जाणून घ्या अयोध्या राममंदिराबद्दल खास माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ram Mandir
Share

२०२४ हे वर्ष संपूर्ण भारतासाठी आणि जगभरातील हिंदू लोकांसाठी अतिशय महत्वाचे आणि खास ठरले. या वर्षाची सुरुवातच अतिशय विशेष अशा सोहळ्याने झाली. मागच्यावर्षी आजच्याच दिवशी सगळ्या भारतीयांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये (Ayodha) श्रीराम मंदिर (Ram Mandir) तयार झाले आणि त्यात रामल्लाची (Ramlalla) स्थापना करण्यात आली. आज या सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. अनेक दशकं सगळ्यांनीच या दिवसाची डोळ्यात तेल घालून वाट पाहिली. अखेर तो दिवस २०२४ या वर्षात आला. (One Year Of Ram Mandir)

आज या सोहळ्याची वर्षपूर्ती आहे. १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता, ज्या राम मंदिरासाठी अनेक वाद, आंदोलनं झाली अखेर ते सर्व संपुष्टात आले, आणि रामभक्तांची आणि रामाची भेट झाली. बराच मोठा काळ झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मिती करण्यात आली. याच मंदिरामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्तांची भेट होत आहे. आज या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनाच्यानिमित्तानेच अयोध्येमध्ये बांधण्यात आलेल्या मंदिराबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया. (Feature Of Ayodha Ram Mandir)

– अयोध्येमधील राम मंदिर हे पारंपारिक नगर शैलीत बांधले गेले आहे. या मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.

– मंदिराची इमारत तीन मजली असून, प्रत्येक मजला २० फूट उंच आहे. यात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे आहेत. – दिव्यांग आणि वृद्ध यात्रेकरूंच्या सोयीसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था देखील मंदिरामध्ये आहे. (Marathi News)

Ram Mandir

– मंदिराच्या मुख्य गर्भगृहात प्रभू रामाचे बालपण स्थापित केले आहे. तर पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार आहे. हॉलमध्ये नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत.

– या मंदिरातील खांब आणि भिंती देव, देवता आणि देवींच्या मूर्तींनी सुशोभित करण्यात आले आहेत. सिंहद्वारमधून ३२ पायऱ्या चढून मंदिराच्या पूर्वेला प्रवेशद्वार बनवले आहे.

– परकोटा (आयताकृती कंपाऊंड वॉल) मंदिराभोवती ७३२ मीटर लांबी आणि १४ फूट रुंदीची आहे. तर कंपाऊंडच्या चार कोपऱ्यांवर भगवान सूर्य, देवी भगवती, भगवान गणेश आणि भगवान शिव ही चार मंदिरे बांधली आहेत.

– उत्तरेकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर आणि दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी प्राचीन काळातील आहे.

– श्री रामजन्मभूमी मंदिर संकुलात, महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषाद राज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांना समर्पित मंदिरे देखील असणार आहेत.

– संकुलाच्या नैऋत्य भागात, कुबेर टिळा येथे, जटायूच्या स्थापनेसह भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही.

– मंदिराचा पाया १४ मीटर जाडीचा रोलर-कॉम्पॅक्टेड कॉंक्रिट (RCC) च्या थराने बांधण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप आले आहे. जमिनीतील ओलावापासून संरक्षणासाठी, ग्रॅनाइट वापरून २१ फूट उंच प्लिंथ बांधण्यात आला आहे.

मंदिर संकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, अग्निसुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे. यासोबतच यात्रेकरूंना वैद्यकीय सुविधा आणि लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २५,००० लोकांची क्षमता असलेले पिलग्रिम्स फॅसिलिटी सेंटर (PFC) बांधले जात आहे.

– या भव्य कॉम्प्लेक्समध्ये आंघोळीसाठी जागा, वॉशरूम, वॉशबेसिन, ओपन टॅप इत्यादीसह स्वतंत्र ब्लॉक देखील असेल. हे मंदिर संपूर्णपणे भारताच्या पारंपरिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले जात आहे. ७० एकर क्षेत्रापैकी ७०% क्षेत्र हिरवेगार ठेवून पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष भर देऊन हे मंदिर बांधले जात आहे.

Ram Mandir

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

रामलल्लाची जी मूर्ती अयोध्येमध्ये स्थापित कऱण्यात आली आहे, ती देखील खूपच खास आहे. ही मूर्ती घडवण्यासाठी जो दगड वापरला गेला आहे तो अनेक निकष पास केल्यानंतर निवडला गेला आहे. हा दगड पाणी शोषणार नाही, वातावरणातील कार्बनसोबत रिऍक्ट देखील करणारा नाहीये. कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे या दगडाची चाचणी करण्यात आली आहे.

==============

हे देखील वाचा : Shriram प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वातील ‘हे’ गुण प्रत्येक व्यक्तीने अंगिकारलेच पाहिजे

==============

या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे. तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल. दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल. यासोबतच या मूर्तीची चमक वर्षानुवर्ष टिकणारी आहे. पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत ५१ इंच अशी या मूर्तीची उंची आहे. रामलल्लाच्या मूर्तीचे वजन जवळपास २०० किलो इतके आहे. रामलल्लाच्या डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे.

यासोबतच रामलल्लाच्या मूर्तीचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून, भव्य कपाळ आणि मोठे डोळे हे या मुर्तीचे मोठे वैशिष्ट्य आहे. ही कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती असून, रामलल्लाच्या हातात धनुष्यबाण देखील आहे. मुख्य म्हणजे रामलल्लाच्या या मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता आपल्यला पाहताचक्षणी दिसते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.