अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राने वेढलेल्या देशामध्ये दिडशे वर्षानंतर एक अनोखी गोष्ट होणार आहे. हा देश स्पन असून त्याची राजधानी माद्रीद आहे. याच स्पेनमध्ये इतिहास बदलणारी घटना होणार आहे. या देशाच्या १५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाची सर्व सूत्रे राणीकडे जाणार आहेत. ( Spain’s Crown Princess Leonor )
२० वर्षाची, निळ्या डोळ्यांची आणि अप्रतिम सौदर्यवान असलेली राजकुमारी लिओनोर ही स्पेनची राणी म्हणून येत्या काही वर्षात स्पेनची सत्ता हाती घेणार आहे. राजा फेलिप आणि राणी लेटिझिया यांची मोठी मुलगी राजकुमारी लिओनोर ही एक प्रशिक्षित पायलट आहे. शिवाय लिओनोर जगभरातील अनेक भाषाही अस्खलितपण बोलू शकते. देशाची सता ताब्यात घेण्याआधी राजकुमारी लिओनोर अन्य महत्त्वाचे प्रशिक्षण प्राप्त करत आहे. लिओनोर तिच्या देशात, स्पेनमध्ये कमालीची लोकप्रिय आहे.

Spain’s Crown Princess Leonor
स्पेनमध्ये गेल्या दिडशे वर्षातून पहिल्यांदाच एका राणीकडे देशाची सर्व सूत्रे येणार आहेत. स्पेनची होणारी नवी राणी आता अवघ्या २० वर्षाची असून तिच्या सौदर्यानं आणि हुशारीनं अवघ्या जगाचं लक्ष तिनं वेधून घेतलं आहे. स्पेनचे राजा फेलिप सहावा आणि राणी लेटिझिया यांची राजकुमारी लिओनोर ही मोठी मुलगी आहे. स्पनेच्या इतिहासात इसाबेला द्वितीय १८०० च्या दशकात स्पेनची पहिली राणी झाली आहे. त्यानतंर राजकुमारी लिओनोर हिच्याकडे स्पेनची सत्ता येणार आहे. ( Spain’s Crown Princess Leonor )
१७०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून स्पॅनिश राजेशाहीवर बोर्बन राजवंशाचे राज्य आहे. बोर्बन राजवंशाने उत्तराधिकाराच्या लढाईत हॅब्सबर्गचा पराभव केला. जनरल फ्रँकोच्या हुकूमशाहीच्या समाप्तीनंतर, १९७५ मध्ये राजा जुआन कार्लोस पहिला यांच्यासोबत स्पेनमध्ये राजेशाही पुनर्संचित झाली. स्पेनच्या लोकशाहीच्या मार्गात राजा जुआन कार्लोस पहिला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०१४ मध्ये, राजा कार्लोसने राजपदाचा त्याग केला आणि त्यांचा मुलगा फेलिप याला सिंहासन सोपवले. आता, राजा फेलिपनंतर, राजकुमारी लिओनोर स्पेनची सत्ता हाती घेणार आहे. लिओनोर दे टोडोस लॉस सॅंटोस दे बोर्बोन आय ऑर्टीझचा जन्म ३१ ऑक्टोबर २००५ रोजी झाला. राजकुमारी लिओनोर जन्मापासूनच सिंहासनाची वारस आहे. त्यामुळेच तिचे राणीपदासाठी प्रशिक्षणही बालवयात सुरु झाले. ( Spain’s Crown Princess Leonor )
=======
हे देखील वाचा : USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय
=======
राजकुमारी लिओनोरचे प्राथमिक शिक्षण एस्क्युएला इन्फेंटिल गार्डिया रियल येथे झाले. इथेच तिच्या वडिलांचेही शिक्षण झाले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये, तिने युनायटेड किंग्डममधील वेल्समधील UWC अटलांटिक कॉलेजमध्ये दोन वर्षांच्या आंतरराष्ट्रीय बॅकलॅरिएट प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला आणि मे २०२३ मध्ये तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तिने स्पॅनिश आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. स्पॅनिश राजघराण्यातील सदस्यांसाठी देशाच्या या तिन्ही दलातील प्रशिक्षण अनिवार्य आहे. राजकुमारी लिओनोर स्पॅनिश आणि फ्रेंच तसेच इंग्रजी, मॅंडरीन आणि अरबी भाषा बोलू शकते. ( Spain’s Crown Princess Leonor )
राजकुमारी लिओनोरने ऑक्टोबर २०२३ मध्ये तिच्या १८ व्या वाढदिवशी औपचारिकपणे स्पॅनिश संविधानाशी निष्ठा ठेवली. तेव्हापासून अधिकृतपणे तिला स्पेनची भावी राणी म्हणून मान देण्यास सुरुवात झाली. तिच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त स्पॅनिश संसदेत मोठा समारंभ झाला. हा समारंभ देशाच्या संविधानिक इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण मानला गेला. यात राजकुमारीने राज कर्तव्याची पूर्तता करण्याची शपथ घेतली.
यानंतर लगेच लिओनोरने लष्करी प्रशिक्षण सुरू केले. तीन वर्ष निओनोरने आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये फक्त औपचारिक नव्हे तर खऱ्या अर्थाने शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारी यांचे प्रशिक्षण घेतले. भावी सम्राट किंवा महाराणीला सशस्त्र दलांची समज असावी. भावी राजा किंवा राणी ही घटनात्मकदृष्ट्या सशस्त्र दलांची सर्वोच्च सेनापती असते. त्यामुळेच स्पेनमध्ये या लष्करी प्रशिक्षणाला मोठे महत्त्व आहे. ( Spain’s Crown Princess Leonor )

Spain’s Crown Princess Leonor
या सर्व काळात राजकुमारी लिओनोरनं अन्य कॅडेट्सप्रमाणेच कठोर दिनचर्या पाळली. तिला कुठलेही शाही अधिकार देण्यात आले नाहीत. जानेवारी २०२४ मध्ये, तिने लष्करी अकादमींच्या क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी आणि व्हॉलीबॉलमध्ये भाग घेतला आणि मिश्र संघ तलवारबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. ३ जुलै २०२४ रोजी, तिचे वडील, राजा फेलिप सहावा यांनी तिला कॅडेट एनसाइन या पदावर बढती दिली आणि तिला ग्रँड क्रॉस ऑफ मिलिटरी मेरिट प्रदान केले. पुढच्या काही वर्षात लिओनोर स्पेनची राणी होणार आहे. आधुनिक काळानुसार ती या पदासाठी स्वतःला तयार करत आहे. सौंदर्य आणि सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सध्या राजकुमारी लिओनोरकडे बघितले जात आहे. ( Spain’s Crown Princess Leonor )
सई बने
