तुम्हाला माहित आहे का ? की, साऊथ कोरिया आणि प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या, या दोघांचं एक खास कनेक्शन आहे. हा तोच साऊथ कोरिया, जो ड्रामा, स्क्विड गेम, BTS साठी फेमस आहे. हे कोरियन लोकं अयोध्येशी इतकं इमोश्नली कनेक्टेड आहेत की, दरवर्षी अंदाजे १००० ते २००० कोरियन अयोध्येला भेट देतात. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण कोरियात ६० लाख पेक्षा जास्त लोकं स्वतःला अशा वंशाचे वारस मानतात, ज्या वंशाचा संबंध थेट आयोध्येशी येतो. कोरिया आणि अयोद्धा यांच्यात जवळपास ४४०० किलोमीटर अंतर तरी त्यांना श्री रामांच्या अयोध्येबाबतीत इतका सॉफ्ट कॉर्नर का? हे आपण जाणून घेऊ. (South Korea)
१३ व्या शतकातल्या कोरियाच्या सामगुक युसा नावाच्या प्राचीन ग्रंथात एक कथा सांगितली आहे. साधारण २००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कोरियात ग्युमग्वान गाया नावाचं छोटं राज्य होतं. ज्यावर एक नाही, तर आठ राजे एकत्र राज्य करत होते. बरं, काही कथांमध्ये ९ राजे सांगितले जातात. तर विषयावर येऊ, त्यांचं वय वाढत चाललं होतं,आणि त्यांना एकच टेंशन होतं, ते गेल्यानंतर त्यांच्या राज्याचा सांभाळ कोण करेल.. मग त्यांनी देवाकडे प्रार्थना केली आणि म्हणाले, “आम्हाला आमच्या नंतर राज्य सांभाळण्यासाठी एक उत्तराधिकारी किंवा वारस दे”, तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. “तुम्ही एका पर्वतावर जा, तिथे तुम्हाला तुमचा उत्तराधिकारी मिळेल”. हे ऐकून ते लगेच पर्वतावर जातात आणि तिथून देवाकडे प्रार्थना करतात. तेवढ्यात वीज कडाडली आणि त्यांच्यासमोर एक संदूक प्रकट झाली. त्यांनी ती उघडली आणि त्यात त्यांना ६ खडक मिळाले. ते घेऊन ते पर्वताखाली आले, त्यांना संदूक मधून आवाज यायला लागला, त्यांनी संदूक उघडली आणि चमत्कार झाला. त्यात त्यांना एक लहान मूल सापडलं. त्या सगळ्यांनी देवाचे आभार मानले. त्याचं नाव त्यांनी किम सूरो ठेवलं आणि मोठा होऊन तो राजा बनला. आता पुढे वंश वाढवायचा तर किमचं लग्न लावून द्यायला हवं. त्याला लग्नासाठी बऱ्याच मागण्या आल्या पण त्याने सगळ्यांना नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की, मला जर देवाने पाठवलं तर माझी होणारी पत्नीलासुद्धा देवच पाठवेल. (Top Stories)
आता या स्टोरी मध्ये ट्विस्ट येतो. कोरियापसून ४००० किलोमीटर दूर भारत देशातल्या अयोध्यात एका राजाला स्वप्न पडतं. त्याच्या स्वप्नात त्याला देव दिसतात ते सांगतात, तुझ्या मुलीचं लग्न किम सूरो नावाच्या राजासोबत होणार आहे. मग काय, दुसऱ्याच दिवशी राजाने आपल्या मुलीला जिचं नाव होतं, सूरी रत्ना तिला कोरियाला पाठवायची सोय करतात. दोन महिने प्रवास करत फायनली ती तिथे पोहोचली. दोघांचं लग्न होतं. सुरिरत्ना नंतर कोरियात हियो ह्वांग-ओक म्हणून ओळखली गेली आणि किम सुरो यांनी मिळून कारक वंशाची स्थापना केली. त्यांना नंतर १२ मुलं झाली. आता या दंतकथेचे उल्लेख कोरियात जरी सापडत असले, तरी भारतात त्याचे पुरावे सापडत नाहीत. पण असं म्हणतात आणि आता हा वंश इतका वाढला की, कोरियात आता ६० लाख लोकं स्वतःला कारक वंशाचे मानतात, जिचा संबंध अयोध्येच्या राजकुमारीशी येतो.(South Korea)
================
हे देखील वाचा : Akashdeep : इंग्लंडविरुद्धची दुसऱ्या कसोटी जिंकल्यानंतर स्टार बॉलर आकाशदीपने विजय केला खास व्यक्तीला समर्पित
================
आता ही गोष्ट १९९७ पर्यंत इतकी स्पष्ट नव्हती, जास्त कोणाला माहित सुद्धा नव्हती. याच काळात कोरियन इतिहासकार भारतात आले. त्यांनी ही गोष्ट खरच खरी आहे का? असा त्याच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी असलेल्या कनेक्शनचा शोध घेतला. या शोधाचा रिजल्ट म्हणजे खरंच सूरी रत्ना नावाची राणी अस्तित्वात होती, जी कोरियात आली होती आणि या संशोधनामुळे २००० मध्ये अयोध्या आणि गिम्हे यांना भारत आणि दक्षिण कोरिया सरकारने सिस्टर सिटीस म्हणून घोषित केलं. पुढच्याच वर्षी २००१ ला अयोध्येत हियो ह्वांग-ओक मेमोरियल पार्क बांधण्यात आलं, ज्याला कोरियन सरकारने आर्थिक आणि सांस्कृतिक पाठबळ दिलं. (South Korea)
२०२४ मध्ये अयोध्येत श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर बरेच फॉरेन कंट्रीमधले लोक अयोध्याला भेट द्यायला येतात. ज्यात कोरियन लोकंसुद्धा होते. असं म्हणतात, दरवर्षी १००० ते २००० कोरियन पर्यटक विशेषकरून दिवाळी, राम नवमी आणि कोरियन फेस्टिवल जेसाला अयोध्येत हियो स्मारकाला आवर्जून भेट देतात. तुम्हाला कोरिया आणि अयोध्या कनेक्शनबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics