भविष्यात तंत्रयुगापुढे कोणत्या समस्या आहेत, याची एक झलक दक्षिण कोरिया या देशात पहायला मिळाली आहे. सध्या एआय युग आहे, असे म्हटले जाते. या एआयमध्ये डेटा सेंटरची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. हेच डेटा सेंटर आगीच्या भक्षस्थळी पडल्यावर संपूर्ण देशाची अवस्था एखाद्या दुर्बळ माणसासारखी होऊन जाते, याचा प्रत्यय दक्षिण कोरिया या देशाला आला आहे. दक्षिण कोरिया सध्या एका अतिशय गंभीर समस्येचा सामना करत आहे. सरकारी डेटा सेंटरमध्ये बॅटरीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे संगणक नेटवर्क बंद पडले आहेत. डेटा सेंटरला लागलेली आग 22 तासांनंतर आटोक्यात आणण्यात आली. (South Korea)
मात्र या आगीमुळे एक प्रमुख सरकारी पोर्टल आणि राष्ट्रीय पोस्टल सेवेच्या बँकिंग शाखेसह अनेक आवश्यक सेवा विस्कळीत झाल्या. यात अंत्यसंस्कार नोंदणीच्या पोर्टलसह अन्य 96 आवश्यक यंत्रणा नव्यानं उभारण्यात येत आहेत. या सर्वांचे पुनर्सक्रियीकरण करण्यासाठी अंदाजे दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या या अपघातानं अनेक देशांना जागृक केलं आहे. देशाचा डेटा सेंटर हा सर्वात सुरक्षित मानण्यात येतो. मात्र दक्षिण कोरियामध्ये याच डेटा सेंटरला आगीनं नष्ट केलं आणि त्यासोबत देशातील सर्वच यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे अशी घटना होऊ नये, म्हणून स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. दक्षिण कोरियामधील आगीनंतर अन्य देशांमधील हिच यंत्रणा आपल्या डेटा सेंटरला अधिक सुरक्षित कसे करावे याबाबत विचार करत आहे. (International News)
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एका घटनेनंतर संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला आहे. राजधानी सोलपासून सुमारे 140 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या डेजिओन येथील राष्ट्रीय माहिती संसाधन सेवा केंद्रामध्ये जबरदस्त स्फोट होऊन आग लागली. यात 647 नागरी सेवा या स्थगित कराव्या लागल्या. एक प्रमुख सरकारी पोर्टल आणि राष्ट्रीय टपाल सेवेची बँकिंग शाखा यांचा समावेश आहे. या सेंटरमध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. तब्बल 22 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यावरुनच या डेटा सेंटरचे किती नुकसान झाले असेल, याचा अंदाज येतो. आग शांत झाल्यावर सेंटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 647 नागरी अर्ज सेवांपैकी 47 नागरी सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र लिथियम-आयन बॅटरीच्या स्फोटानंतर लागलेली ही आग इतकी भयानक होती की, अनेक सरकारी कार्यालयातील संगणक नेटवर्क ठप्प झाले आहे. (South Korea)
या सर्वांची दुरुस्ती करणे आणि सर्व नागरी सेवा पुन्हा सुरुळीत सुरु करणे हे एक आव्हानच असणार आहे. बॅटरी स्फोटामुळे बंद पडलेल्या प्रशासकीय संगणक नेटवर्कचे कामकाज पूर्ण पुनर्संचयनासाठी सुमारे दोन आठवडे लागण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच या आगीच्या घटनेने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बहुतांश देशातील सरकारचे असे डेटा सेंटर आहेत. या सर्वाची सुरक्षा ही सर्वात मोठी जबाबदरी असते. या डेटा सेंटरला आग लागल्यास एखाद्या देशाचे संपूर्ण माहिती उद्ध्वस्त होऊ शकते. दक्षिण कोरिया त्याच परिस्थितीत आहे. मात्र अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून आता अन्य देशातही डेटा सेंटरच्या सुरक्ष यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान या आगीत मोबाईल आयडेंटिफिकेशन सिस्टम आणि ऑनलाइन पोस्टल सेवांसह 96 सरकारी नेटवर्क सिस्टमचे जबरदस्त नुकसान झाले. (International News)
========
हे देखील वाचा : Kim Jong Un : किमची झुकझुकगाडी !
========
22 तासानंतर विझलेल्या या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले, याचा तपास सुरु आहे. आता या डेटा सेंटरची दुरुस्ती करतांना प्रथम सार्वजनिक सुरक्षितता आणि आर्थिक क्रियाकलापांवर थेट परिणाम करणाऱ्या सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम असा झाला आहे की, दक्षिण कोरियामधील स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, देशव्यापी अंत्यसंस्कार बुकिंग साइटवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांना वैयक्तिक स्मशानभूमींशी ऑनलाइन किंवा फोनद्वारे संपर्क साधावा लागला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी या घटनेमुळे ज्यांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा सगळ्या नागरिकांची माफी मागितली आहे. शिवाय आणखी दोन आठवडे सर्व सुविधा पुन्हा सुरळीतपणे सुर होण्यासाठी लागतील, असे सांगितले आहे. (South Korea)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics