जापान आणि दक्षिण कोरिया आपली जुनी दुश्मनी व तणाव दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे आले आहेत. हेच कारण आहे की, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपति युन सुक येओल हे जापानच्या दौऱ्यावर आहेत. याचा उद्देश दोन्ही देशांमध्ये काही दशकांपासून चालत आलेले काही वाद मिटवणे आणि एकमेकांमधील दूरावा कमी करणे. अशातच या दोन्ही देशांमध्ये काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. (South Korea-Japan Dispute)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा हा दोन दिवसीय दौरा आहे. या दरम्यान, दोन्ही देशांमधील गुप्त माहिती सांगणे ते आर्थिक मदतीसारखे काही महत्वाचे अजेंडे असतील. असे समजले जात आहे की, अमेरिकेत दबाबामध्ये दोन्ही देश द्विपक्षीय वार्ता करण्यासाठी पुढे जात आहे. यामुळे क्षेत्रीय अशांति दूर होण्याची अपेक्षा आहे.
जापान आणि दक्षिण कोरियामधील तणावाचे मुद्दे:
-कोरियातील लोक जापानवर महिलांना जापानी सैन्यातील युद्धकालीन वेश्यालयांमध्ये जबदरस्ती ताम करण्याचा आरोप लावतात. तर जापानचे असे म्हणणे आहे की, १९६५ च्या कराराअंतर्गत दक्षिण कोरियाला जबरदस्तीने काम केल्याच्या मोबदल्याच्या रुपात आर्थिक मदत देणे ठरवले गेले होते.
-२०१५ मध्ये दक्षिण कोरिया आणि जापान एक करारावर आले होते. त्याअंतर्गत टोक्योने त्या महिलांची अधिकृत माफी मागितली होती ज्या सांगत होत्या की, त्यांना युद्धकालीन वेश्यालयात गुलाम बनवले होते. तसेच पीडितांच्या मदतीसाठी १ बिलियन येन म्हणजेच ९.२३ मिलियन डॉलरची रक्कम दिली गेली.
-दरम्यान, तत्कालीन दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती मून जे-इन यांनी २०१८ मध्ये हा करार संपवला आणि मदत निधी घेण्यास ही नकार दिला. त्यांनी असे म्हटले की,हे पीडितांच्या चिंतांवर विचार करण्यासाठी पुरेसे नव्हते.
-२०१८ मध्ये दक्षिण कोरियात सुप्रीम कोर्टाने जापानच्या निप्पॉन स्टील अॅन्ड सुमितोमो मेटल कॉर्म आणि मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजलाकाही युद्धकालीन मजबूर मजूरांना नुकसान भरपाई देण्याच आदेश दिला होता. मात्र टोक्योने याच्या विरोधात गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.
-२०१९ मध्ये संबंध तेव्हा बिघडले जेव्हा जापानने दक्षिण कोरियाचील हाय टेक मटेरियलच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यावेळी सियोलने टोक्योसोबत एक गुप्त करार तोडण्याची धमकी दिली. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे ते मागे हटले. त्यानंतर दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी पुढे आले. (South Korea-Japan Dispute)
-गेल्या आठवड्यात युन प्रशासनाने निप्पॉन स्टिल आणि मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रकरणात वादीला नुकसान भरपाई देण्यासाठी एक सार्वजनिक फाउंडेशनच्या स्थापनेचा प्रस्ताव ठेवला. टोक्यो आणि वॉशिंग्टनने या घोषणेचे स्वागत केले. मात्र पीडितांनी योजना फेटाळून लावली. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि जापानने निर्यात प्रतिबंध हटवण्यासाठी बातचीत करण्याबद्दल सांगितले.
-गेल्या वर्षांमध्ये काही दक्षिण कोरियातील लोकांनी जापानच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला आणि देशातील सुट्ट्या रद्द केल्या, सियोल नियमित रुपात काही जापानी पाठ्यपुस्तकांमध्ये इतिहासील लेखनाबद्दल तक्रार करत राहिला. खरंतर टोक्योने दक्षिण कोरियाच्या नेत्यांवर राजकीय फायदा उचलण्यासाठी तणाव वाढवल्याचा आरोप लावला.
हे देखील वाचा- पाकिस्तानात हिंसा, रस्त्यावर समर्थक… इमरान खान यांना अटकेपासून बचाव करण्यासाठी गोंधळ
-दोन्ही देशांमध्ये कोरियात डोक्डो आणि जापानमध्ये ताकेशिमाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्वालामुखी बेटांच्या एका समूहावर सुद्धा वाद आहे. बेट तट रक्ष कर्मचाऱ्यांच्या एका लहान तुकडीसह सियोल द्वारा नियंत्रित आहे, मात्र तेथए टोक्यो सुद्धा त्यावर दावा करतो.