साउथ कोरियाने नुकताच आपला पहिलाच चंद्र ऑर्बिटर लॉन्च केला. अशा प्रकारे साउथ कोरिया चंद्रावर आंतराळयान पाठवणारा सातवा देश बनला आहे. स्पेसएक्स द्वारे लॉन्च करण्यात आलेला हा उपग्रह इंधन वाचवण्यासठी एक लांब, गोल फेऱ्या मारत आहे. याचे प्रक्षेपण २७ जुलैला होणार होते. पण स्पेसएक्स रॉकेटच्या देखरेखीच्या मुद्द्यावरुन त्यासाठी उशिर झाला. जर मिशन यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया, जापान, इज्राइल आणि भारतानंतर साउथ कोरियाचा जगातील असा सातवा देश होईल जो चंद्रावर संशोधनासाठी आपले आंतराळ पाठवेल.(South Korea first lunar orbiter)
साउथ कोरियातील आंतराळ एजेंसी कोरिया एयरोस्पेस रिसर्च इंस्टिट्युट (KARI) यांनी नासा सोबत मिळून २०१४ मध्ये एक चंद्र ऑर्बिटर संदर्भात अभ्यास केला होता. दोन्ही एजेंसीने डिसेंबर २०१६ मध्ये एका करारावर स्वाक्षरी सुद्धा करण्यात आली. जेथे नासाला एक वैज्ञानिक उपकरण पेलोड, दूरसंचारस नेविगेशन आणि मिशन डिझाइनसह चंद्र अभियानात मदत करायची होती. साउथ कोरियातील वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, चंद्र ऑर्बिटर २०३० पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी देशाचे अधिक महत्वाकांक्षी लक्ष्य असणार आहे.
ऑर्बिटर काय करणार?
कोरिय पाथफाइंडर लूनर ऑर्बिटर (Korea Pathfinder Lunar Orbiter) किंवा दानुरी (Danuri) ज्याचा अर्थ कोरियाई भाषेत चंद्रांचा आनंद घेणे असा होते. त्याला फाल्कन ९ ब्लॉक ५ लॉन्च वाहनावर लॉन्च करण्यात आले होते. ऑर्बिटरला पाण्याचे बर्फ, युरेनियम, हिलियम-३, सिलिकॉन आणि अॅल्यूमिनियम सारख्या चंद्रावर असलेल्या संसाधनांचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपवले जाणार आहे. ते भविष्यात चंद्रावर लँन्डिंग करण्याची जागा निवडण्यासह मदतीसाठी एक टोपोग्राफिक नकाशा तयार करेल.(South Korea first lunar orbiter)
हे देखील वाचा- ताइवान मधील Strawberry Soldiers चर्चेत, सैन्यात भरती न होण्यासाठी वाढवतात वजन
पहिला प्रयत्न फसला होता
जून महिन्यात साउथ कोरियाने पहिल्यांदाच आपल्या रॉकेटचा वापर करत उपग्रहांना पृथ्वीच्या चहू कक्षांमध्ये यशस्वीपणे लॉन्च केले होते. त्यांचा पहिला प्रयोग हा गेल्यावेळी फसला होता. त्याचे प्रक्षेपण उपग्रहाच्या कक्षेत पोहण्यासाठी अयशस्वी झाले होते.
भारत आणि साउथ कोरियाचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देश मिशन मूनसाठी अधिक वेगाने काम करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दक्षिण कोरियाचा हे मिशन १८० मिलियन डॉलरचे आहे. चंद्रावरील संशोधानासाठी दक्षिण कोरियाने पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे. जो चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त ६२ मैल म्हणजेच जवळजवळ १०० किलोमीटर उंचीवरुन काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाचा हे सॅटेलाइट सूर्याच्या उर्जेपासून संचलित होणार आहे.