पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात भगवान शंकराच्या पुजेसाठी भाविक मंदिरामध्ये गर्दी करतात. भारतात 12 ज्योतिर्लिंगस्थानी मोठ्या संख्येनं भाविक भगवान शंकराचे दर्शन आणि शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी या महिन्यात जातात. यासोबत भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी पौराणिक वारसा सांगतात, आणि त्यातील गुढ कथांमुळे ही मंदिरे लोकप्रिय झाली आहेत. यामध्ये दक्षिणेकडील काशी म्हणून श्रीकालहस्ती मंदिराची ओळख आहे. श्रीकालहस्ती मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. येथील शिवलिंग हे गुढ मानले जाते. कारण येथील शिवलिंग वायुरूपात विराजमान आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात जेव्हा सर्वच मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात, त्यावेळीही या श्रीकालहस्ती मंदिराचे दरवाजे उघडे असतात. श्रावण महिन्यात या मंदिरात भक्तांचा मोठा मेळा जमतो. (Andhra Pradesh)
भगवान महादेवाला समर्पित असलेला पवित्र श्रावण महिना सुरू आहे. देशभरात शिवमंदिरामध्ये भाविक यामुळे गर्दी करत आहेत. भारतातील कानाकोप-यात भगवान शंकराची मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी काही मंदिरे ही त्यांच्याबाबत असलेल्या गुढ रहस्यांनी आणि चमत्कारांनी ओळखली जातात. असेच एक मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. श्रीकालहस्ती मंदिर नावाच्या या मंदिराला ‘दक्षिणेची काशी’ असेही म्हणतात, या मंदिरात भगवान शंकर वायुच्या रूपात विराजमान झाले आहेत. पुजारीही येथे भगवान शंकराच्या या अनोख्या रुपाला स्पर्श करु शकत नाहीत. (Social News)
श्रीकालहस्ती मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती शहराजवळील श्रीकालहस्ती नावाच्या शहरात आहे. हे मंदिर स्वर्णमुखी नदीच्या काठावर वसलेले आहे. ही स्वर्णमुखी नदी पेन्नार नदीची उपनदी आहे. दक्षिण भारतातील भगवान शंकराच्या प्रमुख तीर्थस्थळांपैकी हे एक स्थळ आहे. हजारो वर्ष जुन्या असलेल्या या मंदिराचे वास्तुशास्त्रही अभ्यासण्यासाठी या भागात गर्दी होते. हजारो वर्षापूर्वीचा भारतीय वास्तूकलेचा अजोड नमुना म्हणूनही श्रीकालहस्ती मंदिराकडे बघितले जाते. श्रीकालहस्ती मंदिराला श्रीकालहस्तेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीचा एक अनोखा संगम आहे. या मंदिर परिसरात एक वडाचे झाड असून त्याला स्थल वृक्ष म्हटले जाते. (Andhra Pradesh)
श्रीकालहस्ती मंदिरात येणारे भाविक आधी या वडाच्या वृक्षाजवळ नतमस्तक होतात. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी भावना आहे. या वृक्षाभोवती रंगीबेरंगी धागे बांधून भाविक आपल्या इच्छा मागतात. आणि या इच्छा पूर्ण झाल्यावर भाविक पुन्हा या श्रीकालहस्ती मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. श्रीकालहस्ती मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मंदिराचे नाव कसे पडले, याचीही कथा सांगितली जाते. श्रीकालहस्ती मंदिराचे नाव तीन प्राण्यांच्या नावावरून पडले आहे. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती. या तिघांनीही येथे भगवान शंकराची पूजा केली. त्यामुळे तिघांनाही मोक्षाची प्राप्ती झाली. आणिखी एका आख्यायिकेनुसार, शिवलिंगावर तपश्चर्या करताना एका कोळ्याने जाळे तयार केले. तर सापाने लिंगाभोवती स्वतःला गुंडाळून घेत पूजा केली. (Social News)
हत्तीने शिवलिंगाला पाण्याने स्नान घातले. या तीन प्राण्यांच्या भक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यावरुनच मंदिराचे नाव ठेवण्यात आले. या तीन प्राण्यांच्या मूर्ती देखील मंदिरात स्थापित केल्या आहेत. यासंदर्भात स्कंद पुराण, शिव पुराण आणि लिंग पुराण या हिंदू ग्रंथांमध्येही श्रीकालहस्तीचा उल्लेख आहे. आणखी एक आख्यायिका आहे की, कन्नप्पा नावाच्या एका शिका-याने शिवलिंगातून रक्त वाहताना पाहिले हे रक्त थांबवण्यासाठी त्यानं स्वतःचे डोळे भगवान शंकराला अर्पण केले. त्याच्या या भक्तीमुळे, भगवान शंकराने त्याची दृष्टी परत करत त्याला मोक्षही प्रदान केला. माता पार्वतीनेही शापातून मुक्ती मिळविण्यासाठी येथे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिरात माता पार्वतीची ज्ञान प्रसुनंबिका देवी म्हणून पूजा केली जाते. या श्रीकालहस्ती मंदिराचे वास्तुशास्त्र अजोड आहे. या मंदिरात तीन विशाल गोपुरम आहेत. (Andhra Pradesh)
========
Varanasi : तिळभांडेश्वर मंदिराचे रहस्य !
=========
मंदिरात शंभर खांब असलेले मंडप असून त्याच्यावरचे नक्षीकाम अद्वितीय असेच आहे. मंदिरात शास्त्रशिवलिंग देखील आहे. मोठ्या पूजासमारंभावेळी या शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येते. या मंदिराच्या उभारणीसाठी तत्कालीन राजांनी योगदान दिले आहे. मंदिराचा आतील भाग 5 व्या शतकात पल्लव काळात बांधला गेला. मुख्य रचना आणि गोपुरम 11 व्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिला यांनी बांधल्याची माहिती आहे. 16 व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने 120 मीटर उंच राजगोपुरम बांधले असून हे राजगोपुरम द्रविड वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. मंदिराभोवती श्री सुब्रह्मण्य स्वामी मंदिर, पुलिकट तलाव असून मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक या भागालाही भेट देतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics