आपल्याला नेहमीच कलाकारांकडे पाहून त्यांच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. नेम, फेम, मनी, ग्लॅमर आदी आपल्याला नेहमीच या क्षेत्राकडे आकर्षित करत असते. मात्र या कलाकारांना देखील खूपच समस्या असतात. अनेकदा काही कलाकार स्वतःहून त्यांच्या समस्या सांगतात. तर काही कलाकार त्यांच्या समस्या जगासमोर आणत नाही. जेव्हा आपल्या आवडत्या कलाकारांच्या आजाराबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल समजते तेव्हा वाईट वाटते. (actress anushka shetty has a rare laughing disease)
काही कलाकारांच्या आजारांबद्दल आपण ऐकले तर आपल्याला वाईट तर वाटते पण नवल देखील वाटते कारण काही कलाकारांचे आजार आपण पहिल्यांदाच ऐकतो, त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदाच कलाकारांकडून समजते. नुकतेच अलका याग्निक यांनी त्यांच्या ‘रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ या दुर्मिळ आजाराबद्दल एक पोस्ट करत माहिती दिली.
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री बाहुबली फेम अनुष्का शेट्टीने तिच्या एका विचित्र आजाराबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तिचा आजार ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेकदा आपण आजारी असलो किंवा तणावात असलो की, डॉक्टर हसण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा हेच हसू तुमच्यासमोर आजार बनून येते तेव्हा…?
विचारत पडला ना…? हो हसणे थांबवता न येते किंवा हसू कंट्रोल न होते हा देखील एक आजार आहे. हाच आजार अनुष्का शेट्टीला झाला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “जर मी हसायला सुरुवात केली, तर मी माझे हसू १५ ते २० मिनिटे इच्छा असली तरी थांबू शकत नाही. मी सिनेमातील, शोमधील कॉमेडी सीन बघताना किंवा असे सीन शूट करताना मी पोट धरून हसते. मी अक्षरशः जमीवर झोपून देखील हसते. याच कारणामुळे माझे शूटिग अनेकदा थांबविण्यात यायचे.”
अनुष्काने सांगितले की, तिला स्यूडोबुलबार इफेक्ट (Pseudobulbar Affect) म्हणजेच पीबीए नावाचा आजार आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून, या आजाराचा परिणाम मेंदूवर होतो. या अवस्थेत रुग्ण अनियंत्रितपणे हसतो किंवा रडतो. या आजारामुळे, रुग्ण व्यक्ती दुःखद प्रसंगावर हसते किंवा काही मजेदार परिस्थितीत रडते देखील. मुख्य म्हणजे ही स्थिती काही सेकंदांपासून कित्येक मिनिटांपर्यंत टिकून राहते.
या आजारावर होणाऱ्या उपचारांमध्ये, या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषधे दिली जातात. या आजारावर डिप्रेशनच्या औषधांनी देखील उपचार केला जातो. या आजारात ध्यानधारणेद्वारे देखील ब्र करण्याचा प्रयत्न केला जातो.
तत्पूर्वी अनुष्का शेट्टीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’ सिनेमाच्या माध्यमातून भेटीस आली होती. आता अनुष्का तिच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.