साउंड थेरपी (Sound Therapy) तुम्हाला मानसिक आणि शारिरीक रुपात आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते. सध्याच्या दिवसात बदलती जीवनशैली आणि अनहेल्थी डाएटमुळे बहुतांश लोकांना तणाव येतो. या दरम्यान तुम्ही मानसिक रुपात खुप थकलेले वाटता. अशातच तुम्ही साउंथ थेरपीची मदत घेऊ शकते. ही थेरपी तुमचा तणाव दूर करण्यास ही मदत करते.
साउंड थेरेपी मध्ये क्रिस्टल किंवा धातुची वाटी घेऊन त्यापासून ध्वनी निर्माण करतात. अशातच तुम्ही गाण सुद्धा गुणगुणू शकता. या ध्वनी पासून निघणाऱ्या वायब्रेशनमुळे तुमचे डोके शांत राहण्यास मदत राहते. यामुळे शरिराला सुद्धा खुप आराम मिळतो. यामुळे तणाव ही कमी होतो. तर साउंड थेरेपीचे काही प्रकार असतात. यामध्ये मल्टीडाइमेंशनल म्युझिक थेरपी, हिलिंग विथ वॉइस, बाइन्यूरल साउंड थेरेपी, साइकोजयोमेट्रिक म्युझिक, नॉर्डऑफ-रॉबिन्स, सोनिक एक्युपंक्चर, हिलिंग विथ सिंगिंग बाउल्स आणि ब्रेनवेव इनट्रेनटमेंटचा समावेश आहे.
साउंड थेरेपी (Sound Therapy) मानसिक रुपात ठिक करते. त्याचसोबत डिप्रेशन दूर होते. यामुळे तणावाचा स्तर ही कमी होतो. तुमचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे नात्यात सुधारणा होते. ही थेरपी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास ही मदत करते. अंग दुखणे, पोट दुखणे किंवा हाडांमध्ये दुखण्यापासून ही दिलासा मिळतो. या व्यतिरिक्त साउंड थेरपी कॅन्सरचा धोका कमी करण्यास ही मदत करते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासह उत्तम झोप ही या थेरपीमुळे येते. तुमचा मूड उत्तम होतोच पण स्ट्रोकचा धोका ही कमी होतो.
हे देखील वाचा- गुडघे दुखत असतील तर ‘ही’ योगासनं देतील आराम
साउंड थेरेपीच्या सेशन दरम्यान काय होते?
४०-६० मिनिटांपर्यंत होणारे हे सेशन एका साउंड हिलिंग एक्सपर्ट किंवा हिलरच्या नेतृत्वात केले जाते. ज्यामध्ये काही उपकरण जसे की, ट्युनिंग फोर्क आणि सिंगिग बॉउल या सारख्या गोष्टींपासून ध्वनी तरंग निर्माण होतात. जर तुम्ही एखाद्या सेशन मध्ये सहभागी होऊ पाहत आहात तर एका योगा मॅटवर झोपण्यासाठी तुम्हाला प्रथम सांगितले जाते. त्यानंतर तुमच्या डोळ्यांवर एक मास्क लावला जातो. संगीत गुणगुणण्यासह ही प्रक्रिया सुरु केली जाते. यामध्ये साउंड हिलर काही प्रकारचे आवाज वाजवतात आणि तुम्हाला विश्रामच्या स्थितीत घेऊन येतात.
साउंथ थेरेपी ही नवी असल्याचे समजले जाते. मात्र तसे नसून ही थेरेपी फार जुनी आहे. साउंड थेरेपी यापूर्वी ग्रीसमध्ये वापरली जात होती. ग्रीसमध्ये साउंड थेरेपीद्वारे मेंदूसंदर्भातील आजारांचे उपचार केले जातात. त्यावेळी विशिष्ट साउंडचा वापर करुन तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.