कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच अनोखे आणि घट्ट नाते असते. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. आजच्या घडीला तर बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेत्यांमध्ये एक नाव प्रामुख्याने येते आणि ते म्हणजे सोनू सूदच (Sonu Sood). कोरोना काळात सोनुने गरजवंतांना मदत केली आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे मोठे काम केले, त्यानंतर सोनू तर सर्वांसाठीच एक रियल हिरो म्हणून समोर आला. कोरोना काळापासून सोनू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहू लागला. लोकं त्याला या माध्यमातून त्यांच्या समस्या सांगत त्याच्याकडे मदत मागताना दिसतात. याशिवाय त्याला इथे अनेक मजेशीर मेसेज देखील येत असतात. सोनू अनेकदा अशा मजेशीर मेसेजला उत्तर देतो आणि प्रकाशझोतात येतो. लोकं अनेकदा त्यांचे प्रेम दाखवताना असे काही करून बसतात जे पाहून सोनू (Sonu Sood) देखील हैराण होतो आणि काय उत्तर द्यावे ते त्याला समजत नाही. मात्र सोनू नेहमीच त्याच्या उत्तम सेन्स ऑफ ह्युमरचा वापर करत फॅन्सला उत्तरं देताना दिसतो. आता सध्या देखील तो अशाच एका ट्विटमुळे मीडियामध्ये गाजताना दिसत आहे.
तर झाले असे की ट्विटरवर एका युजरने एक फोटो शेअर केला असून या फोटोवर उत्तर देण्यापासून सोनू देखील स्वतःला रोखू शकला नाही. युजरने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती बाईकवर बसलेला दिसत आहे. आता तुम्ही म्हणाला यात काय वेगळे आहे. बाईक नाही तर बाइकची नंबर प्लेट खास आहे. कारण या बाईकच्या नंबर प्लेटवर सोनू सूदचे (Sonu Sood) स्केच बनवलेले दिसत आहे. या स्केचसोबतच तिथे लिहिले आहे की, “द रियल हीरो सोनू सूद”. हा फोटो पाहिल्यावर सोनू सूदने यावर उत्तर दिले आहे. त्याने त्याच्या स्टाईलमध्ये मजेशीर पद्धतीने उत्तर देताना लिहिले, “हा नक्कीच पावती फाडून घेणार आणि नंतर माझ्याकडून वसूल करणार.” सध्या सोनूच्या फॅनचा फोटो आणि त्यावर सोनुने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, नेटकरी देखील यावर त्यांच्या भन्नाट कमेंट्स देत आहेत.
यह पक्का चालान कटवाएगा
— sonu sood (@SonuSood) April 28, 2022
और बाद में मुझ से ही भरवाएगा 😂 https://t.co/iAjcaQa4Sl
दरम्यान अलीकडेच मनोरंजनविश्वात ‘राष्ट्रभाषा’ विषयावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता अजय देवगण आणि कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप यांच्यामध्ये सुरू असलेल्या या ट्विटर वॉरमध्ये अनेक कलाकार त्यांचे मत मांडताना दिसत आहे. यावर अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) देखील त्याचे मत मांडले असून, तो म्हणाला की, “मला नाही वाटत की हिंदीला केवळ राष्ट्रभाषा म्हटले जाऊ शकते. भारताची एकच भाषा आहे आणि ती म्हणजे मनोरंजन.” सोनू सुदशिवाय राम गोपाळ वर्मा, यांनी देखील त्यांचे मत मांडले आहे सध्या सोशल मीडियावर हा वाद खूपच गाजत असून, या वादामुळे अजय देवगणला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
==========
हे देखील वाचा – आईसीसीआरकडून ‘चित्रपट आणि सॉफ्ट पॉवर’ विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन
==========
तत्पूर्वी सोनू सूदच्या (Sonu Sood) वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच ‘आचार्य’ या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात चिरंजीवी आणि रामचरण मुख्य भूमिकेत दिसतील याशिवाय सध्या तो रोडीजमध्ये देखील दिसत आहे.