Home » तर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या का?

तर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या का?

by Team Gajawaja
0 comment
Sonia Gandhi
Share

2004 साली काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण पंतप्रधान झाले मनमोहन सिंह. काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद का नाकारलं? त्या मुळच्या विदेशी असल्यामुळे त्यांना पंतप्रधानपद नाकारलं होतं? की हा त्यांचाच निर्णय होता? जाणून घेऊयात,1996 साली काँग्रेसचा पराभव झाला आणि तेव्हापासून देशात राजकीय अस्थिरतेचा काळ सुरु झाला. १९९६ ते १९९८ मध्ये तीन सरकारे येऊन गेली. १९९९ साली वाजपेयींच सरकार आलं आणि ते पाच वर्ष टिकलं. २००४ साली भाजपने इंडिया शायनिंगचा नारा दिला. पण त्यांचा पराभव झाला. काँग्रेसला बहुमत तर नाही मिळालं. पण लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला. डाव्या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली आणि युपीएचं सरकार स्थापन होणार होतं. (Sonia Gandhi)

काँग्रेसच्या या यशाचं सर्व श्रेय सोनिया गांधी यांना दिलं जात होतं. पंतप्रधानपदासाठीही त्यांचंच नाव चर्चेत होतं. पण सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत. विरोधकांनी आधीच सोनिया गांधी यांच्या परदेशी मूळ असलेला मुद्दा काढला. पण सोनिया गांधी पंतप्रधान का झाल्या नाहीत. त्याचं पहिलं कारण सांगितलं जातं की सोनिया गांधी मुळच्या इटलीच्या असल्याने त्यांना पंतप्रधान होता आलं नाही. हे खरं आहे की त्या मूळच्या इटलीच्या होत्या. पण त्यांनी राजीव गांधी यांच्याशी लग्न केलं होतं. त्यामुळे त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं होतं. जी व्यक्ती भारतात मतदान करू शकते ती पंतप्रधानही होऊ शकते. पण त्यांचा परदेशी असल्याचा मुद्दा खोटा निघाला. तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपले आत्मचरित्र विंग्स ऑफ फायरमध्ये हे स्पष्ट केलं होतं की सोनिया गांधी यांनी ठरवलं असतं तर त्या पंतप्रधान झाल्या असत्या. त्यांचा परदेशी असण्याचा काही संबंध नव्हता हे यातून स्पष्ट झालं. (Sonia Gandhi)

======

हे देखील वाचा : तोंड सांभाळून बोला नाहीतर…

======

दुसरं एक कारण समोर येतं ते राहुल गांधी यांचं. काँग्रेसचे दिवंगत नेते नटवरसिंह यांनी आपल्या आत्मचरित्र वन लाईफ इस नॉट इनफमध्ये म्हटले आहे की राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यापासून रोखलं. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होणार होते. सोनिया गांधी यांनी राजीव गांधींना पंतप्रधान होऊ नका अशी विनंती केली. तुमचाही असाच खून होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली. राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांचा सल्ला ऐकला नाही आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुढे सात वर्षांनंतर सोनिया गांधी यांची भिती खरी ठरली. लिट्टे या तमिळ दहशतवादी संघटनेने राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या केली. राहुल गांधींना आपल्या आईची काळजी होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली होती, आपल्या आईबाबत असे होऊ नये म्हणून राहुल गांधींनी सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखलं. त्यासाठी राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना एक दिवसाचा अवधीही दिला होता. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांचा सल्ला मानला. आणि मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले. (Sonia Gandhi)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.