Home » सोनाली कुलकर्णीचे आकर्षक फोटोशूट

सोनाली कुलकर्णीचे आकर्षक फोटोशूट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sonalee Kulkarni Photoshoot
Share

Sonalee Kulkarni Photoshoot

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. अभिनय, डान्स यामध्ये निपुण असलेली सोनाली सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Photoshoot

नुकतेच सोनालीने तिचे साडीतले काही झकास फोटो शेअर केले आहे. हे फोटो आणि त्यातल्या तिच्या अदा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot

सोनालीने पिस्ता रंगाची साडी नेसून कमाल फोटोशूट केले आहे. तिचे या साडीतले फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot

या फोटोमध्ये सोनालीने नेटची पिस्ता रंगाची साडी आणि त्यावर त्याच रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. साडीवर पांढऱ्या रंगाची अतिशय सुरेख डिझाइन केलेली असून, ती या साडीला अधिकच सुंदर बनवत आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot

सोनालीने तिचा मेकअप अतिशय साधा ठेवला असला तरी तिने जांभळ्या रंगाचे आयलायनर लावले. सोबतच गुलाबी रंगाची लिपस्टिक लावत मेकअप पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot

सोनालीने या साडीवर कुंदनचे दागिने घातले आहे. यात नेकलेस, कानातले आणि बांगड्या तिने मॅच केल्या आहेत. सोनालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. तिच्या लूकचे कौतुक करताना तिने लूक उत्तम पद्धतीने कॅरी केला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.