Home » काय सांगता! अप्सरा सोनाली कुलकर्णी दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात

काय सांगता! अप्सरा सोनाली कुलकर्णी दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात

by Team Gajawaja
0 comment
Sonalee Kulkarni
Share

मनोरंजनविश्वाने आतापर्यंत विविध ट्रेंड सेट केले आहेत. अर्थात या ट्रेंड मागची त्यांची भावना नक्कीच वैयक्तिक आणि प्रेमळ होती. कलाकारांनी सेट केलेले विविध ट्रेंड कधी कधी सामान्य माणसांना देखील रुचतात आणि ते देखील त्यांच्या आयुष्यात फॉलो करताना दिसतात. मनोरंजनविश्वात अगदी सर्रास पाहायला मिळणार ट्रेंड म्हणजे कलाकारांच्या आपल्याच जोडीदारासोबत दुसऱ्यांदा लावले जाणारे लग्न. आतापर्यंत आपण असे बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत असे पाहिले असेल. कारण कोणतेही असो मात्र आपल्याच जोडीदारासोबत पुन्हा लग्न लावणे ही कल्पनाच भन्नाट आहे. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये असेच गाजलेले लग्न होते अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांचे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांचे लग्न लावून दिले. 

आता पुन्हा एकदा आपल्याला मराठी मनोरंजनविश्वात असेच एक लग्न पाहायला मिळणार आहे. हे लग्न आहे मराठीमधील अप्सरा असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि तिचा नवरा असलेल्या कुणाल बेनोडेकर यांचे. आपल्या सौंदर्यासोबतच नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातलेल्या सोनालीने पुन्हा एकदा नवऱ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोनालीने (Sonalee Kulkarni) कुणालसोबत मागच्यावर्षी ७ मे २०२१ रोजी दुबईमध्ये लग्न केले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जगात लागलेल्या लॉकडाऊनमुळे या लग्नाला सोनाली आणि कुणालचे आईवडील देखील उपस्थित नव्हते. व्हिडिओ कॉलद्वारे ते या लग्नाचा भाग झाले आणि सोनाली कुणालला आशीर्वाद दिला. दुबईमध्ये सोनालीने एका मंदिरात लग्न केले. मात्र हे लग्न तिला आईवडिलांशिवाय अपूर्ण वाटत होते, म्हणूनच आता सोनालीने (Sonalee Kulkarni) लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा कुणालसोबत मोठ्या धुमधडाक्यात आईवडील, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी  लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लग्न लंडनमध्ये पार पडणार आहे. 

आज मंदिरातही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून सोनाली (Sonalee Kulkarni) आणि कुणाल यांच्याकडे पाहिले जाते. सोनाली आणि कुणाल यांच्या नात्याबद्दल सर्वानाच माहिती होती मात्र तिने लग्न केल्यानंतर काही दिवसांनी जाहीर केले आणि मीडिया, इंडस्ट्रीसोबतच तिच्या फॅन्सला देखील सुखद धक्काच बसला. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच व्हायच्या मात्र सोनाली अशा पद्धतीने लग्न केल्याचे जाहीर करेल यावर कोणालाच विश्वास नव्हता. 

=====

हे देखील वाचा – हृतिक रोशन आणि सुजेन खान आले एकत्र!, मुलांसोबत घेतला लंचचा आनंद 

=====

कुणालचा मनोरंजनविश्वाशी कोणताच संबंध नाही. तो फायनान्स क्षेत्रात कार्यरत आहे. मूळचा लंडनचा असलेला कुणाल कामाच्या निमित्ताने दुबईमध्ये असतो. त्याचे शिक्षण आणि बालपण सर्वच लंडनमध्ये गेले. आता येत्या ७ मे रोजी पुन्हा एकदा सोनाली (Sonalee Kulkarni) लग्न करणार म्हटल्यावर तिच्या फॅन्समध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.