गुजरात येथील सोमनाथ मंदिराचा 12 ज्योतिर्लिंगामध्ये समावेश होतो. गुजरातमधील सौराष्ट्र येथे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष चंद्रदेवांनी केल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर सोन्याचे असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिरातील शिवलिंग हे अधांतरी रहात होते. महमूद गझनीने या सोमनाथ मंदिरावर आक्रमण करत मंदिराची संपत्ती लुटून नेली. मंदिराला असलेले सोन्याचे दरवाजेही गझनीनं तोडले. मात्र या शिवलिंगाचेही नुकसान गझनीनं केले. समस्त हिंदू समाजाच्या मनावर यामुळे मोठा आघात झाला होता. (Gujarat)
आता याच शिवलिंगाबाबत एक मोठी बातमी पुढे आली आहे. बरोबर 1000 वर्षानंतर मेहमूद गझनीनं नष्ट केलेले शिवलिंग पुन्हा प्रकट झाल्याची माहिती आहे. सोमनाथ मंदिरातील शिवलिंग पुन्हा सापडल्याचा दावा आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी केला आहे. तुर्क शासक महमूद गझनवीने तोडलेल्या या शिवलिंगाचा काही भाग दक्षिण भारतातील अग्निहोत्री कुटुंबातील लोकांनी नेला होता. आता हाच काही भाग श्री श्री रविशंकर यांच्याकडे आला असून मुळ पवित्र शिवलिंगाचा भाग असलेल्या या शिवलिंगावर अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच त्यांची स्थापनाही कऱण्याचा मानस श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असलेल्या गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रोज हजारो भाविक येतात. या सोमनाथ मंदिराची निर्मिती प्रत्यक्ष भगवान चंद्रदेवानं केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या परिसरात चंद्रदेवाने भगवान शंकराला यांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती. त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान शंकराची पुजा येथे चंद्रदेवानं केली. यावरुनच या मंदिराचे नाव सोमनाथ मंदिर ठेवण्यात आले.
या मंदिरातील शिवलिंग हे चमत्कारिक होते. हे शिवलिंग हवेत डोलत असल्याचे सांगितले जाते. त्याच्यात असलेल्या चुंबकीय शक्तीमुळे हा चमत्कार होत होता. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर होते. या मंदिराचा बहुतेक भाग हा सोन्यानं मढवलेला होता. याच्या पाय-यांवर माणिक, मोती होते, अशीही माहिती आहे. या मंदिराची ख्याती आणि श्रीमंती ऐकून 1026 मध्ये, मुस्लिम आक्रमक महमूद गझनीने मंदिरावर हल्ला केला आणि ते लुटले. यात गझनीनं क्रूरपणे सोमनाथ शिवलिंगही तोडले. हेच शिवलिंग आता पुन्हा प्रकट झाल्याचा दावा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केला असून या शिवलिंगाची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अरब प्रवासी अल-बिरुनी यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात सोमनाथ मंदिरावर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. या हल्ल्यात गझनीने मंदिराचे ज्योतिर्लिंग तोडले होतेच, शिवाय मंदिरातील प्रचंड संपत्ती त्यानं लूटून नेली. यात अनेक अनमोल हि-यांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. या हल्ल्यानंतर, गुजरातचा राजा भीम आणि मालव्याचा राजा भोज यांनी सोमनाथ मंदिर पुन्हा बांधले. (Gujarat)
जेव्हा गझनीचे सैनिक या मंदिरावर चालून आले तेव्हा या मंदिराच्या शिवलिंगाला मंदिरातील पुजारी कुटुंबांनी लपवून ठेवले होते. या कुटुंबातील पुजा-यांनी तत्कालीन परिस्थिती आणि मुस्लिम शासकांचा जाच यामुळे सोमनाथ शिवलिंगाला आपल्याकडे लपवून ठेवले. मात्र ठराविक कालावधीनंतर पुजारी पंडित सीताराम शास्त्री यांनी शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याशी संपर्क साधून आपल्या कुटुंबात असलेल्या अनमोल खजिन्याची माहिती दिली. त्यानंतर शंकराचार्यांनी या शिवलिंगाची पुनः प्रतिष्ठापना करण्याची जबाबदारी श्री श्री रविशंकर यांना दिल्याची माहिती आहे. सोमनाथ मंदिरातील मुळ शिवलिंग हे जमिनीपासून दीड ते दोन फूट वर हवेत स्थापित केले होते. श्री श्री रविशंकर यांनी या शिवलिंगाबाबत एका लेखामधून ही माहिती दिली आहे. तसेच या शिवलिंगाचा अधांतरी रहाण्याचा गुणधर्मही दाखवला आहे. आता या शिवलिंगाची स्थापना कऱण्यापूर्वी त्याच्यावर अनेक धार्मिक विधी कऱण्यात येणार आहेत. (Social News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
आपल्या राष्ट्रासाठी हा आध्यात्मिक जागृतीचा क्षण असल्याचेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले आहे. हे शिवलिंग गेल्या शतकात प्राणदेव सरस्वती यांच्या हाती आले. यानंतर, कौटुंबिक परंपरेमुळे, हे शिवलिंग पंडित सीताराम शास्त्री यांच्या हाती आले. त्यांनी हे शिवलिंग शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडे नेले. त्यांनी बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्याकडे शिवलिंग देत त्याची स्थापना करण्याचा आदेश दिले आहेत. श्री श्री रविशंकर यांनी ही जबाबदारी घेतली असून हा मोठा धार्मिक सोहळा असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले आहे. (Gujarat)
सई बने