प्रेम ही एक अशी भावना आहे जी, तुम्हाला इतर कोणासाठी तरी समर्पित होण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी प्रोत्साहित करते. जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाबद्दल अशी भावना अनुभवता, तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबत लग्नाच्या बंधनात गुंतायचं असतं. भारतीय संस्कृतीतही विवाह हे अत्यंत पवित्र नाते मानले जाते. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी एका कुटुंबात येतात आणि जन्मभराच्या नात्यात बांधले जातात. (Sologamy trend)
पण गेल्या काही वर्षांत, प्रेम किंवा विवाह हा दोन भिन्न लिंगांमधील विषय राहिलेलाच नाही. अशी अनेक लग्नं दिसतात, जिथे दोन मुलांची लग्नं होतात, तर कुठे दोन मुलींची लग्नं थाटामाटात पार पडतात. एकूणच, लग्न हे दोन व्यक्तींमधील नाते आहे. पण अलीकडे स्व-विवाह करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. स्व-विवाह करण्याच्या या ट्रेंडला सोलोगॅमी म्हटले जात आहे. चला जाणून घेऊया की, लोक जोडीदाराशिवाय लग्न कसे करतात? सोलोगामी म्हणजे काय? लोकांना स्वतःशी लग्न का करावे वाटते?

सोलोगॅमी म्हणजे काय?
दोन लोक जसे एकमेकांवर प्रेम करतात, तसेच जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल, तर लग्नासाठी दोन व्यक्तींची गरज लागत नाही. तुम्ही स्वतःशीच लग्न करू शकता. ज्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचे आहे आणि ज्यांना कोणत्याही जोडीदाराची गरज नाही, अशा व्यक्ती सोलोगॅमी लग्नाकडे वळतात. (Sologamy trend)
सोलोगॅमी केव्हा सुरू झाली?
जरी भारतात आताच सोलोगॅमी विवाह पाहायला मिळाले असले, तरी अशा विवाहाचा इतिहास जुना आहे. प्रथम अमेरिकेत सोलोगॅमीची सुरुवात झाली होती. १९९३ मध्ये अमेरिकेतील एका महिलेने स्वतःशी लग्न केले. त्या महिलेचे नाव होते लिंडा बार्कर. लिंडाने स्व-विवाहासाठी ७५ पाहुण्यांना आमंत्रित केले होते. त्यानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये सोलोगॅमीचा ट्रेंड वाढला आणि आता हा ट्रेंड भारतातही पोहोचला आहे. (Sologamy trend)

भारतातील पहिली सोलोगॅमी
अलीकडेच भारतात सोलोगॅमी, म्हणजेच स्व-विवाहाचे एक प्रकरण समोर आले आहे. गुजरातमधील वडोदरा येथे क्षमा बिंदू नावाच्या मुलीने ११ जून रोजी स्वतःशी लग्न केले. हे भारतातील पहिले सोलोगॅमी वेडिंग आहे, ज्यामध्ये मंडप होता, लग्नाच्या विधी होत्या, पाहुणे होते, नवरी होती, जयमाला होती, सिंदूर होते, हुंडा होता, लग्नानंतर हनीमूनही असेल, पण नवरदेव नव्हता. स्वतःशीच लग्न करण्याचा विचार क्षमा बिंदूला का सुचला? तिच्याकडूनच जाणून घेऊया… (Sologamy trend)
हे देखील वाचा: सलमान खानची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो अभिनेता

सोलोगॅमी करण्याचा विचार का आला?
क्षमा बिंदूच्या म्हणण्यानुसार, तिला लग्न अजिबात करायचे नव्हते. मात्र तिला नवरी बनायचे होते. काही मुलींना नवरी बनायचे असते, त्यांना लग्नात सुंदर लेहेंगा घालायचा असतो, पण त्यासाठी त्यांना इतर कोणत्या नात्यात बंधायचं नसतं. क्षमा बिंदूचेही असेच विचार होते. त्यामुळे तिने लग्नासाठी जोडीदार न शोधण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःशीच लग्न करण्याचा विचार केला. (Sologamy trend)
सोलोगॅमीमध्ये, लग्नानंतर तुमच्या नात्याची स्थिती विवाहित होते. तुम्ही स्वतःशी लग्न केले आहे, मग या लग्नात तुम्हीच तुमचे जोडीदार असता. तुम्ही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःवरच अवलंबून असता.