रशियाला उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग यांनी भेट दिली, तेव्हापासून उत्तर कोरिया, रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत करणार अशी अटकळ बांधली जात होती. झालेही तसेच. उत्तर कोरियानं रशियाला आपली प्रगत क्षेपणास्त्र दिली आणि सोबत 1500 सैनिकांची पहिली तुकडी पाठवल्याची बातमी आली. हुकूमशहा किम जोंगचे सैनिक रशिया-युक्रेन युद्धभूमीवर आले की या युद्धात रशियाचे पारडे अधिक जड होईल असे मानले जात होते. मात्र आता त्याच्या उलट परिस्थिती आहे. या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी आलेल्या उत्तर कोरियाच्या जवळपास सर्व सैनिकांचा फडशा युक्रेन सैन्यानं पाडला आहे. ही एक धक्कादायक गोष्ट आहे. कारण हुकुमशहा किम जोंगचे सैन्य जगात चौथ्या क्रमांकाचे सैन्य मानले जाते. (Kim Jong)
या सैनिकांचे प्रशिक्षण अतिशय कडक नियम लावू करण्यात येते, असेही सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात युद्धभूमीवर हे सैन्य कुचकामी ठरले आहे. यात रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाचे सैन्य मारले गेले आहे. यापैकी अनेकांना क्षेपणास्त्र कशी मारायची, किंवा शत्रू पक्षाकडून मारल्या गेलेल्या क्षेपणास्त्रांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे साधे जुजबी प्रशिक्षणही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युद्धभूमीवर उत्तर कोरियाचे सैन्य सैरावैरा पळतांना पाहून रशियन सैन्यानंही डोक्याला हात मारून घेतला आहे. यातील बरेचसे सैन्य मृत्यूमुखी पडले असून काही सैनिकांना युक्रेनच्या सैनिकांनी अटक केल्याची धक्कादायक बातमी आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याचे सैनिक युद्धभूमीत मारले जात आहेत. रशियाच्या मदतीसाठी उत्तर कोरियांनं 1500 सैनिक पाठवले होते. पण युद्धभूमीवर याच सैनिकांचे रक्षण करण्याची वेळ रशियन सैनिकांवर आली आहे. (International News)
वास्तविक उत्तर कोरियाचे सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सैन्य असल्याचे सांगितले जाते. त्याला उत्तर कोरिया पीपल्स आर्मी असे म्हणतात. या पीपल्य आर्मीचे ट्रेनिंग कमांडोबेस असते. अतिशय कठिण परिस्थितीत राहून शत्रूला नामोहरण करण्याचे ट्रेनिंग त्यांना देण्यात येते, अशीही माहिती आहे. त्यामुळेच युद्धात उत्तर कोरिया आल्यास रशियन सैनिकांची बाजू अधिक भक्कम होणार असल्याची अटकळ होती. मात्र प्रत्यक्षात उतर कोरियाच्या सैनिकांना त्यांच्याच देशातील क्षेपणास्त्रेही चालवता येत नसल्याचे स्पष्ट झाले. रशियाच्या मदतीला आलेल्या उत्तर कोरियायी सैन्य कुर्स्क प्रदेशात तैनात करण्यात आले होते. त्यापैकी 1,000 सैनिक मारले गेल्याची माहिती आहे. (Kim Jong)
तर शंभरहून अधिक उत्तर कोरियायी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. याहून धक्कादायक म्हणजे, काही उत्तर कोरियाच्या सैनिकांना युक्रेनच्या सैनिकांनी अटक केली आहे. तेव्हा हे सैनिक वयानं लहान, प्रकृतीनं कमकुवत आणि प्रशिक्षण नसल्याचे आहेत, हे स्पष्ट झाले आहे. या सैनिकांना युद्धभूमीवर कसे लढावे याचे प्रशिक्षणही देण्यात आले नव्हते. युक्रेनियन ड्रोनने कुर्स्कच्या जंगलांवर हल्ला केला तेव्हा हे सैनिक स्वतःचा बचाव करीत पळत सुटले. त्यापैकी काही आपसूकच युक्रेन सैनिकांच्या ताब्यात सापडले. त्यांना असा आधुनिक युद्धाची माहितीच नसल्याचे पाहून युक्रेनचे सैनिकही चक्रावले होते. विशेष म्हणजे, या क्षेपणास्त्र हल्ल्यात उत्तर कोरियाच्या जनरलचाच मृत्यू झाला. क्षेपणास्त्र हल्ला झाला तेव्हा तोही स्वतःचा बचाव करतांना पळत होता. या सैनिकांना रशियाच्या सैन्यानंही कुठलंही प्रशिक्षण दिलं नाही. कारण या सैनिकांनी उत्तर कोरियामधील भाषेशिवाय कुठलिही भाषा येत नाही. इंग्रजी वा अन्य भाषेचं त्यांना ज्ञान नाही. त्यामुळे रशियन सैन्यही त्यांच्यापासून अंतर ठेवून आहे. (International News)
=======
हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !
Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !
=======
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे की, रशियात आल्यापासून या उत्तर कोरियाच्या सैन्यानं लढण्यापेक्षा पार्टी करण्यातच काही दिवस घालवले. उत्तर कोरिया म्हणजे एकप्रकारची जेलच आहे. या जेलमधून सैनिक म्हणून का होईना पण बाहेर पडता आले, याचेच खूप अप्रूप या सैनिकांना आहे. त्यामुळे सुरुवातीचा आठवडा तर या युक्रेनच्या सैनिकांनी सिनेमे बघण्यात आणि मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ बघण्यात घालवल्याचे सांगितले जाते. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग यांने 1500 सैनिकांची एक तुकडी पाठवल्यावर रशियाच्या मदतीसाठी आणखी सैनिक पाठवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता या पहिल्या तुकडीतील हातावर मोजता येतील एवढेच उत्तर कोरियाचे सैनिक उरले आहेत. तेही जखमी आहेत. त्यामुळे किमनं जरी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला तरी रशिया त्यांना स्विकारणार का हा प्रश्न आहे. (Kim Jong)
सई बने