Home » इलेक्ट्रिक नव्हे तर पाण्यावर चालणार गाड्या

इलेक्ट्रिक नव्हे तर पाण्यावर चालणार गाड्या

by Team Gajawaja
0 comment
Solar power technology
Share

जगभरत कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहानांना प्रोत्साहन दिले जात आहे. पण आता लवकरच कार्बन-डाय-ऑक्साइड आणि पाण्याने तयार करण्यात आलेल्या इंधनावर वाहने चालणार आहेत. वैज्ञानिकांनी अशी एक सोलर पॉवर टेक्निक विकसित केली आहे ज्याच्या माध्यमातून असे संभव होणार आहे. CO2 आणि पाण्याच्या मदतीने लिक्विड इंधन तयार केले जाणार आहे. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, हे नवे तंत्रज्ञान भविष्यात इलेक्ट्रिक व्हिकलचा ऑप्शन ठरेल. हा दावा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकत्याच आपल्या एका रिसर्चमध्ये केला आहे. (Solar power technology)

या तंत्रज्ञानाचा वापर अगदी सहज करता येणार आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, जर हे तंत्रज्ञान अपेक्षेनुसार यशस्वी ठरले तर इलेक्ट्रिक वाहनांना ते मागे टाकू शकते. जाणून घेऊयात ते तंत्रज्ञान नक्की काय आणि कसे काम करणार आहे त्या बद्दलच अधिक.

यासाठी संशोधकांनी एक आर्टिफिशियल लीफ तयार केले. त्यावर सुर्याच्या किरणांचा वापर करुन पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइडला एथेनॉल आणि प्रोपेनॉलमध्ये बदलते. हे असे इंधन आहे जे सामान्य इंधनाच्या तुलनेत फार कमी कार्बन उत्सर्जन करते.

आर्टिफिशियल लीफ आपली एक वेगळी एनर्जी निर्माण करतात. वैज्ञानिकांनी लॅबमध्ये प्रयोगादरम्यान लीफला सुर्याच्या किरणात घेऊन जाण्यापूर्वी कार्बन डाय ऑक्साइड आणि पाण्यात बुडवले होते. त्यानंतर सुर्याचा प्रकाश दाखवला. येथे झालेल्या रिअॅक्शन नंतर ग्रीन फ्यूल तयार केले गेले. हे असे ग्रीन फ्यूल आहे जे कार्बनचे कमी उत्सर्जन करतात. अशा प्रकारे ते पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल आणि ग्लोबल वॉर्मिंगला रोखण्यासाठीचे लक्ष्य ही पूर्ण करेल.

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर अशावेळी केला जाणार आहे जेव्हा गाडी थेट ही सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येईल. कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यापासून तयार होणाऱ्या वाफेमुळे नैसर्गिक रुपात इंधन तयार केले जाईल.

नेचर एनर्जी जर्नलमध्ये पब्लिश रिसर्च रिपोर्टमध्ये संशोधक डॉ. मोटियर रहमान असे म्हणतात की, आम्ही अशी आर्टिफिशियल लीफ डिवाइस विकसित केले आहे जे CO2 आणि सूर्य प्रकाशाचा वापर करुन मल्टीकार्बन अल्कोहोल तयार करतात. (Solar power technology)

हेही वाचा- आता घरबसल्याही करता येईल ट्रेनच्या जनरल डब्याच्या तिकिटाचे बुकिंग

आर्टिफिशियल लीफमध्ये काही प्रकारचे मेटल लेअर आहेत. जसे की, कॉपर, ग्लास, सिल्वर आणि ग्रेफाइट. हे थेट झाडांच्या पानांसारखे काम करते. आर्टिफिशियल लीफमध्ये अशा एका गोष्टीचा वापर करण्यात आला आहे जो प्रकाशाला एब्जॉर्ब करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे पानांमध्ये असलेले मॉलिक्युल सूर्याच्या प्रकाशाचा वापर करतात. संशोधकांनी असे म्हटले आहे की, आता पर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर केवल लॅबमध्येच करण्यात आला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.