तुमची मुलं सोशल मिडिया किती वेळ वापरतात, हा प्रश्न प्रत्येक पालकाला विचारला तर त्याचं येणारं उत्तर हे धक्कादायक आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून आज अगदी पाच वर्षापासूनची मुलं या सोशल मिडियाची अँडिक्ट झाली आहे. विशेषतः फेसबुक आणि इन्स्टाग्राम यावर येणारे रिल एकापाठोपाठ एक बघण्याचं व्यसनच या मुलांना लागले आहे. एकाच जागी बसून ही मंडळी रिल बघत राहतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. शिवाय मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. फक्त आपल्या देशातच नव्हे तर ही जगभरातील लहान मुलांमध्ये ही समस्या वाढीस लागली आहे. या समस्येपासून लहान मुलांची सुटका कशी करायची यावर चर्चा आणि उपाय सुचवण्यात येत आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आता या समस्येवर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या देशात 16 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले फेसबुक-इन्स्टा वापरू शकणार नाहीत. (Social Media)
त्यासाठी स्वतंत्र कायदाच करण्यात आला आहे. या दोन माध्यमातून अनेकवेळा लहान मुले अश्लिल, हिंसक, विभित्सक रिल बघत असल्याचे या देशाच्या पहाणीत आले. त्यामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी या मुलांना खूप अवघी लागणार आहे. परिणामी त्यांच्या पुढच्या आय़ुष्यातील महत्त्वाची वर्ष या मानसिक रोगावर विजय मिळवण्यासाठी खर्ची होणार आहेत. या सर्वांचा सामाजिक परिणाम भयानक आहे. यासंदर्भात परिक्षण केल्यावर ऑस्ट्रेलियन सरकारनं थेट फेसबूक आणि इन्स्टाग्राम सारख्या साईट लहान मुलांपासून दूर करण्यासाठी कायद्याचा आधार घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या आदेशाचा अभ्यास आता जगभरातील भारतासह अन्य देशांनीही सुरु केला आहे. सोशल मीडियामुळे मुलांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी असाच कायदा यापुढे जगभरातील अन्य देशातही लागू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियन सरकारनं माहितीपत्रक जाहीर केले आहे. (International News)
त्यानुसार 6 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी यांनी पुढाकार घेतला. त्यावरुन ऑस्ट्रेलियात ही सोशल मिडियाची समस्या किती गंभीर झाली असेल याची कल्पना येते. या पत्रकानुसार सोशल मीडियामुळे लहान मुलांचे बालपण हरवत आहे. ही गोष्ट भविष्यासाठी चुकीची आहे. हे नुकसान टाळण्यासाठी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा कायदा करण्यात येणार आहे. यासंदर्भात संसदेतील प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. हा कायदा मंजूर झाल्यावर 12 महिन्याच्या आता त्याची अंमलबजावणी ऑस्ट्रेलियात सुरु होणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात येणार आहे. यात पालकांचाही समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, आता वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील मुले आपल्या पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मिडिया वापरु शकणार नाहीत. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक सोबत TikTok आणि X वर देखील बंदी घालण्यात येणार आहे. शिवाय या यादीत अल्फाबेटच्या यूट्यूबचाही समावेश होण्याची शक्यता आहे. (Social Media)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
तसेच आणखीही काही साईट मुलांच्या भविष्यासाठी विपरीत परिणामकारक असल्यास त्यांच्यावरही नंतर बंदी घालण्यात येईल, अशी तरतूद या कायद्यात कऱण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी यासंदर्भात अहवाल मागवला जाणार आहे. त्यात ज्या साईट मुलांसाठी घातक आहेत, असा शेरा लावून येतील, त्यांच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी यासर्वांसाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियामुळे मुलांचे खरे नुकसान होत आहे आणि ते थांबवण्यासाठी मी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियामध्ये या कायद्याचे पालक वर्गांनी स्वागत केले आहे. तसेच शिक्षकांनीही पंतप्रधानांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी सोशल मिडियाला लहान मुलांपासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचे मत सर्व थरातून व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियापूर्वी फ्रान्सने देखिल 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याच वेळी, अमेरिकेनेही 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर प्रवेश करण्यासाठी पालकांची परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत. (International News)
सई बने