Home » सोशल मीडिया फ्रेंडली Hashtags साठी ‘या’ वेबसाइट्स येतील कामी

सोशल मीडिया फ्रेंडली Hashtags साठी ‘या’ वेबसाइट्स येतील कामी

by Team Gajawaja
0 comment
Social Media Hashtags
Share

सोशल मीडियात कोणतीही न्यूज, फोटो-व्हिडिओ किंवा एखादी ब्लॉग पोस्ट तयार करण्यासाठी बहुतांश लोक हॅशटॅग्सचा वापर करतात. हॅशटॅग शिवाय कोणतीही पोस्ट सर्च करणे मुश्किल होते. याच कारणास्तव जे लोक नॉर्मल टॅग्स वापरुन पोस्ट करतात त्यांचा रिच (reach) कमी होतो आणि ते निराश होतात. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या येत असेल तर त्यासाठी ही उपाय आहे. (Social Media Hashtags)

खरंतर इंटरनेटवर अशा काही वेबसाइट्स आङेत ज्याच्या माध्यमातून टॉप ट्रेंडिंग हॅशटॅग मिळू शकतात. या व्यतिरिक्त तो हॅशटॅग किती लोकांनी वापरला याची सुद्धा माहिती मिळते. या हॅशटॅगमुळे तुमच्या पोस्टचा रिच वाढू शकतो.

-ऑल हॅशटॅग्स (All #Tags)
केवळ फोटोच नव्हे तर व्हिडिओ, न्यूज शेअर करण्यासाठी हॅशटॅगची गरज भासते. all-hashtags.com च्या वेबसाइटवर तुम्हाला विविध कॅटेगरीनुसार हॅशटॅग मिळतील. त्यामुळे तुम्हाला जो हॅशटॅग हवा आहे तो तुम्ही तेथून घेऊ शकता. त्याचसोबत युजर्ससाठी ही वेबसाइट फ्री मध्ये उपलब्ध आहे.

Social Media Hashtags
Social Media Hashtags

-आयक्यू हॅशटॅग (IQ Hastags)
विज्ञान आमि टेक्नॉलॉजी संदर्भातील लोक सोशल मीडियात व्हिडिओ अपलोड करतेवेळी टॅग्स कळत नसल्याने लोक त्याशिवाय ही अपलोड करतात. खुप सब्सक्राइबर असले तरीही भले ते लोकप्रिय आहेत पण त्यांचा रिच होत नाही. त्यासाठी तुम्ही थेट App.iqhastags.com च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

-फ्लिक (Flick)
flick.tech वेबसाइटवर टॅग्स सर्च करण्याव्यतिरिक्त शेड्यूल आणि अॅनालाइसिस करणे सुद्धा अत्यंत सोप्पे होते. यामध्ये बहुतांश असे टॅग्स मिळतात जे आधीपासूनच बॅन आहेत. काही लोक खुप टॅग्सचा वापर करतात. त्यापैकी काही बॅन असतात. यामुळे त्यांच्या पोस्टचा रिच वाढत नाही.(Social Media Hashtags)

-Display Purpose
displaypurpose.com वेबसाइट सर्व युजरसाठी मोफत उपलब्ध आहे. यावर फॅशन, टेक, पॉलिटिक्स, शॉपिंग अशा विविध कॅटेगरीतील संबंधित टॅग्स मिळतात. यामध्ये कोणत्याही एकावर क्लिक केल्यानंतर सर्व एकाच वेळी कॉपी करु शकतात. या व्यतिरिक्त ते कॉपी करणे अत्यंत सोप्पे ही आहे.

हे देखील वाचा- आता इंटरनेटशिवाय ही चालवता येईल व्हॉट्सअॅप, ‘हे’ नवे फिचर येईल कामी

-हॅशटॅग स्टॅग
hashtagstack.com वेबसाइटवर सर्व टॅग्सच्या समोर युजर्सची संख्या पहायला मिळते. म्हणजेच आता पर्यंत किती लोकांनी त्याचा वापर केला आहे हे सुद्धा कळते. ते तपासून पाहिल्यानंतर तुम्ही ते कॉपी करु शकतात. या व्यतिरिक्त कॅटेगरीनुसार बहुतांश टॅग्स ही दिसतात. यामध्ये कोणतेही तुम्ही कॉपी करु शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.