काही व्यक्ती अशा असतात की, त्यांना पार्टी करणे, नव्या लोकांना भेटणे, आपली ओळख वाढवणे किंवा नवे मित्र बनवणे आवडते. मात्र असे ही काही लोक असतात ज्यांना सोशल होणे, लोकांमध्ये मिसळणे किंवा सार्वजनिक ठिकाणी बसताना सुद्धा एंजाइटी वाटते. तर साइकसेंट्रलच्या मते, असे व्यक्तिमत्व असलेली लोक लाजाळू व्यक्तींपेक्षा वेगळ्या असतात. सोशल ऑकवर्ड नेचर असणाऱ्या या लोकांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे किंवा डोळ्यात डोळे घालून बोलण्यास समस्या येते. अशा लोकांना सोशल स्थितीवेळी घाम फुटतो आणि ते लोकांशी व्यवस्थितीत बोलू शकत नाहीत. त्यांना भीती वाटु लागते. जर तुमच्यासोबत सुद्धा असे काही होत असेल तर तुमच्यामध्ये काही सकारात्मक बदल होण्याची फार आवश्यकता आहे. त्यासाठी खालील काही टीप्स जरुर वाचा.(Social awkwardness)
प्रॅक्टिस करा
तुम्ही एकटे असताना स्वत:ला अज्ञात व्यक्ती मानून बोला आणि कोणत्याही विषयावर बोलण्याचा अभ्यास करा. घेतलेला विषय अगदी सोप्पा असू द्या. जसे की, आजचा दिवस किती सुंदर आहे, आज कार्यालयात एखाद्याचा वाढदिवस आहे.
नजरेला नजर मिळवून बोलण्याचा प्रयत्न
प्रयत्न करा की, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवून बोलू शकता. जेव्हा तुम्ही असे करण्यास शिकाल तेव्हा तुम्हाला लहान लहान गोष्टींमधून ही खुप काही कळेल. त्याचसोबत तुमचा आत्मविश्वास ही वाढेल आणि तुमची बॉडी लॅग्नवेंज ही सकारात्मक दिसेल.
दुसऱ्यांवर फोकस करा
तुम्ही लोकांना प्रश्न करा आणि त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून ते काय बोलतायत याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी उत्तम पद्धतीने कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला त्याचे बोलणे स्पष्ट कळण्यास मदत होईल. तसेच एका फ्लो मध्ये सुद्धा तुम्हाला बोलण्याची सवय लागेल.
रिलॅक्स रहा
लक्षात ठेवा की, व्यक्ती स्वत: मधील चुका दूर करण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही.त्यामुळे तुम्ही सुद्धा सकारात्मक राहत स्वत:ला रिलॅक्स ठेवा. दुसरा व्यक्ती कसा वागतोय त्याच प्रमाणे वागणे सोडून तुमची जी शैली आहे बोलण्याची-वागण्याची ती जपा.(Social awkwardness)
हे देखील वाचा- तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? : जाणुन घ्या फायदे
कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
काही वेळा आपण आपल्या कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाहीत. याच कारणामुळे आपल्यात काही बदल घडण्यासाठी समस्या येते. जर तुम्ही सुद्धा असेच करत असाल तर स्वत:ला प्रोत्साहित करत स्वत: मध्ये बदल करण्यासाठी मित्रपरिवाराची किंवा तज्ञांची मदत घ्या.