Social Anxiety Reasons :
Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं
काहींना तर लोकांना भेटणे अजिबात आवडत नाही. खरंतर, लोकांना न भेटणे, सोशल सर्कलमध्ये मिक्स न होणे यामागे काही कारणे असू शकतात. या स्थितीला एंग्जायची डिसऑर्डरचे संकेत असल्याचे मानले जाते. यामुळे आयुष्य प्रभावित होऊ शकते. याचा परिणाम तणाव वाढणे, दैनंदिन कामे करण्यास अडथळे येणे अशा वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. अशातच सोशल एंग्जायटीची कारणे काय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अनुवांशिक कारण
वैज्ञानिक म्हणतात की, सोशल एंग्जायटी डिसऑर्डर अनुवांशिक असू शकते. जर कुटुंबामध्ये एखाद्याला ही समस्या असल्यास त्याच्या पुढच्या पिढीतील एखाद्याला होण्याची शक्यता असते.
बालपणीचे काही अनुभव
बालपणी उद्भवलेल्या काही वाईट परिस्थिती, भावनात्मक उपेक्षा, शाळेत बुलिंगचे शिकार होणे अशा काही घटनांमुळे सोशल एंग्जायटी वाढली जाऊ शकते.
मेंदूसंबंधित समस्या
मेंदूमध्ये एमिग्डाला हे डोक्यात निर्माण होणाऱ्या उगाचची भीतीची प्रतिक्रिया नियंत्रित करण्याची भूमिका पार पाडते. ज्या व्यक्तींमध्ये एमिग्डाला अति सक्रिय झाल्यास त्यांच्यामध्ये भीती अधिक वाढली जाते. यामुळे सामाजिक स्थितीत चिंता वाढली जाते.

Social anxiety reasons
=======================================================================================================
हेही वाचा :
Saree : साडीला सेफ्टी पिन्स लावली की साडी फाटते? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स
Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं
=======================================================================================================
मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरमध्ये बदल
ब्रेनमध्ये न्यूरोट्रांसमीटरच्या असंतुलनामुळे व्यक्तीमध्ये अधिक चिंता आणि भीती निर्माण होते. यामुळे सोशल एंग्जायटीची समस्या उद्भवू शकते.
व्यक्तीमत्व आणि आत्मसन्मानाची कमतरता
ज्या व्यक्तींचा स्वभाव अतिसंवेदनशील असतो किंवा आत्मसन्मान कमी असतो त्यांना सामाजिक परिस्थितींमध्ये भीती वाटू लागते. (Social Anxiety Reasons)
सोशल एंग्जायटीपासून दूर राहण्यासाठी उपाय
-व्यक्तीने सकारात्मक विचार करावा. याशिवाय कोणत्याही चुकीच्या विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
-आपल्याबदल इतर लोक काय विचार करतील या विचाराने आपण लोकांना भेटणे टाळू नये.
-भिती आणि चिंता मेडिटेशनच्या मदतीने दूर करू शकता.
-पुरेशी झोप घेतल्यास मेंदूसंदर्भातील समस्यांपासून दूर रहाण्यास मदत होईल.
-आपण जास्तीत जास्त लोकांनाच्या संपर्कात असणच हेच या समस्येचे समाधान आहे.