बहुतांश लोक आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. परंतु काही लोकांना फेसवॉश ऐवजी साबणानेच चेहरा स्वच्छ धुतला जातो असे वाटते. पण याबद्दल माहिती नसते की, साबणाने चेहरा धुतल्यास त्वचेचा कोमलपणा हा कमी होऊ शकतो. भले साबण हा एक पॉवरफुल क्लिनर असला तरीही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य यामुळे कमी होऊ शकते.(Soap Side Effects)
त्वचा तज्ञांच्या मते, साबण हा वाईट स्किन प्रोडक्ट पैकी एक आहे. हा केवळ तुमची त्वचा नव्हे तर चेहऱ्यावरील कोलमता ही कमी करु शकतो. असे जर तुम्ही दररोज कर असाल तर तसे करणे थांबवा. कारण चेहऱ्याला साबण लावल्याने तुमची त्वचा सुकलेली आणि कोरडी पडल्यासारखी दिसते.
साबण वापरल्याने होणारे दुष्परिणाम
साबण त्वचेवर जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतो. प्रदुषणामुळे फ्री रेडिकल्समुळे होणारे नुकसान कमी केले जाते आणि डेड स्किन सेलही हटवतो. भले साबणात ऐवढ्या गोष्टी असल्या तरीही चेहऱ्यावर त्याचा वापर करण्यापासून दूर राहिले पाहिजे. तर जाणून घेऊयात साबणामुळे तुमच्या त्वचेला नक्की काय नुकसान होऊ शकते.
-सध्याच्या काळात साबणात असलेले केमिकल्स टॉक्सिन्स, बॅक्टेरिया आणि अन्य घाण पार्टिकल्स हे त्वचेवरील स्तराच्या खोलवर जाता. हेच कारण आहे की, त्वचेला नुकसान पोहचू लागते. चेहऱ्यावक साबणाचा सातत्याने वापर केल्यास रेडनेस, ड्रायनेस, जळजळ होणे, खाज येणे आणि सुरकुत्या ही पडू शकतात.
-त्वचेत विविध प्रकारचे रोगजनक आढळतात. जे त्वचेच्या स्तराला नुकसान पोहचवणारे बॅक्टेरिया, वायरस आणि फंगसच्या हल्ल्यापासून बचाव करतात. त्यांना त्वचेचे मायक्रोबायोमच्या रुपात ओळखले जाते. साबणात असलेले केमिकल्स त्वचेवरील अॅसिडिटी कमी करतात आणि बहुतांश जीवाणूंचा खात्मा करतात. हेच कारण आहे की, लोकांना त्यांच्या त्वचेवर सूज, इंन्फेक्शन आणि पिंपल्सची समस्या उद्भवते.
-साबणाचा दररोज वापर केल्याने त्वचेच्या पृष्छभागावर असलेले पोर्स बंद होऊ शकतात. तज्ञांच्या मते, असे अशा कारणास्तव होते कारण बहुतांश साबमात फॅटी अॅसिड असते. जे स्किन पोर्समध्ये जाऊन जमा होतात आणि त्यांना ब्लॉक करतात. यामुळेच ब्लॅकहेड्स, ब्रेकआउट, इंन्फेक्शन सारख्या समस्या निर्माण होतात.(Soap Side Effects)
हे देखील वाचा- Back Acne मुळे त्रस्त असाल तर अशी घ्या काळजी
-साबणामुळे त्वचेवरील ते विटामिन्स निघून जाऊ शकता जे त्याला हेल्दी आणि फ्रेश ठेवण्यास मदत करतात. तज्ञांच्या मते, साबणात असलेले स्ट्राँन्ग केमिकल्स त्वचेवरील विटामिन डी चा स्तर कमी करतात.