Home » आतापर्यंत या कलाकारांनी साकारल्या आहेत हनुमानाच्या भूमिका!

आतापर्यंत या कलाकारांनी साकारल्या आहेत हनुमानाच्या भूमिका!

by Team Gajawaja
0 comment
Artist
Share

रामायण, महाभारत या भारतीय पौराणिक महाकाव्यांवर आधारित आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकांमधून साकारली गेलेली पात्रे लोकांनी फक्त पसंद केली नाहीत तर अक्षरशः खऱ्याखुऱ्या देवीदेवतांप्रमाने त्यांची पूजा केली आहे. मुख्यतः टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून रामायण आणि महाभारत घराघरात जाऊन पोहोचले. रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर साकारलेले ‘रामायण’ आजही कौतुकाचा विषय आहे. असे म्हणतात की, टीव्हीवर ज्या वेळेला रामायण लागायचं त्यावेळी रस्ते ओस पडायचे. लोकं आपापल्या घरात रामायण बघण्यात एवढे रमून गेलेले असत. ज्याप्रमाणे राम, लक्ष्मण अन सीता सिरियल्सच्या माध्यामतून लोकांच्या मनात ठाम घर करून बसले त्याचप्रमाणे रामभक्त हनुमान यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. ही सगळे पात्रे (Artist) लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात त्या त्या अभिनेत्यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. आतापर्यंत सिरियल्सच्या माध्यमातून आलेल्या रामायणात कुणी कुणी हनुमानाची भूमिका साकारली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. (Artist)

दारा सिंघ

जेव्हा-केव्हा रामायणावर आधारित नवीन सिनेमा सिरियल्स येवू लागते तेव्हा हमखास त्यांची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणाशी केली जाते. रामानंद सागर यांचे ‘रामायण’ मैलाचा दगड मानले जाते. लहानथोरांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याजणांना या रामायनाने भुरळ घातली होती. या मालिकेत दारा सिंघ यांनी साकारलेली हनुमानाची भूमिका अजरामर झाली. भारदस्त आवाज, अवाढव्य व्यक्तिमत्व अन कमालीचे अभिनय कौशल्य यामुळे लोकांनी दारा सिंघ यांना लोकांनी या भूमिकेत पसंद केले होते. (Artist)

विदू दारा सिंघ

दारा सिंघ यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने, विदू दारा सिंघ यांनी देखील हनुमानाची भूमिका साकारली. १९९५ मध्ये आलेल्या जय वीर हनुमान या मालिकेमध्ये विदू दारा सिंघ यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयकौशल्याने त्यांनी या भूमिकेला जिवंत केले. विदू दारा सिंघ यांना या भूमिकेत लोकांनी पसंतीची पावती दिली. (Artist)

राज प्रेमी

१९९७ साली जय हनुमान या नावाने एक मालिका सुरु झाली होती. संजय खान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेत हनुमानाची भूमिका राज प्रेमी यांनी साकारली होती. राज प्रेमी यांनी या भूमिकेला न्याय देत भूमिका पडद्यावर उभी केली. त्यांनादेखील या भूमिकेसाठी लोकांनी खूप पसंद केले होते. (Artist)

दानिश अख्तर

अभिनेता दानिश अख्तरने छोट्या पडद्यावर हनुमानाची भूमिका साकारली तेव्हा त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. दानिश 2015 मध्ये सिया के राम या मालिकेत हनुमाच्या भूमिकेत दिसला. या मालिकेत आशिष शर्मा रामाच्या भूमिकेत आणि मदिराक्षी मुंडल सीतेच्या भूमिकेत दिसले होते. (Artist)

=========

हे देखील वाचा : डिसलेक्सियाने त्रस्त मुलगा, हॉटेल मधील वेटर ते बॉलीवूडचा सुप्रसिद्ध ‘सितारा’!

=========

भानुशाली इशांत अन निर्भय वाधवा

2015 मध्ये टीव्हीवर संकट मोचन महाबली हनुमान सुरू झाला. या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका भानुशाली इशांतने साकारली होती. इशांतने त्याच्या बाल हनुमान पात्रातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आणि त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळाले. दुसरीकडे, तरुण हनुमानाची भूमिका निर्भय वाधवाने साकारली होती. (Artist)

एकाग्र द्विवेदी

अलीकडील काळात एकाग्र द्विवेदी या बालकलाकाराने ‘कहत हनुमान जय श्री राम’ या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील अभिनयाने एकाग्रने लोकांच्या मनात घर केले. त्याने निरागसपणे साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे लोकांनी त्याला आणि भूमिकेला आपलेसे करून घेतले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.