अमेरिकेचा कॅलिफोर्निया आगीच्या ज्वाळांनी होरपळून निघत असतांना आता अमेरिकेच्या दक्षिण भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असून या भागातील स्थानिकांनी 1963 नंतर एवढी बर्फवृष्टी प्रथमच झाल्याचे सांगितले आहे. यामुळे अमेरिकेचा दक्षिण भाग गोठला आहे. या जोरदार बर्फवृष्टीमुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या भागात पुढच्या काही दिवसात अशीच परिस्थिती रहाणार असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या बर्फवृष्टीचा फटका येथील सर्वच सेवांना बसला आहे. रस्त्यावरील वाहूतूक मंदिवली असून विमानांचे उड्डानेही रद्द करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात कडाक्याच्या थंडीचा कहर आहे. दक्षिण अमेरिकेच्या मोठ्या प्रांतात हिवाळी वादळाचा तडाखा बसला आहे. याचा परिणाम म्हणून आतापर्यंत 2100 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (America)
येथील सर्वच रस्त्यांवर बर्फाची जाड चादर पसरली आहे. त्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद असून नागरिकांना रोजच्या गरजेच्या वस्तू मिळणेही कठिण झाले आहे. टेक्सास, लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, जॉर्जिया, मिलवॉकी, साउथ कॅरोलिना आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे. या भागात 10 इंचापेक्षा जास्त बर्फ पडला आहे. येथील स्थानिकांच्या मते 1963 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बर्फवृष्टीमुळे शाळा आणि अन्य कार्यालयेही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बहुतांश भागात शून्य अंश तापमानाची नोंद झाली आहे. (International News)
तर या कडाक्याच्या थंडीमुळे टेक्सास, जॉर्जिया आणि मिलवॉकीमध्ये आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बर्फवृष्टीचा मोठा फटका ह्यूस्टन विमानतळाला बसला आहे. ह्यूस्टनचे जॉर्ज बुश इंटरकॉन्टिनेंटल विमानतळ आणि विल्यम पी. हॉबी विमानतळ बंद असल्यानं अनेक प्रवासी या विमानतळावर अडकले आहेत. न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथेही मोठे हिमवादळ असून अशीच परिस्थिती पुढचे काही दिवस रहाणार अशी भीती व्यक्त होत आहे. लुईझियानाचे गव्हर्नर जेफ लँड्री यांनी पुढील सात दिवसांत थंडी अधिक वाढणार असल्याचे जाहीर केले आहे. या भागातील रस्ते बर्फापासून मोकळे कऱण्याचे काम चालू आहे. मात्र नागरिकांना शक्यतो घरातच रहावे असे आवाहन आहे. (America)
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
जोरदार बर्फवृष्टीमुळे काही भागातील विद्युत पुरवठ्यावरही परिणाम झाल्यानं नागरिक हवालदिल झाले आहेत. या बर्फवृष्टीनं अनेक वर्षांचा विक्रम तोडला असला तरी अद्यापही या बर्फवृष्टीची भयानकता बाकी असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढील परिस्थिती अधिक धोकादायक असू शकते, अशा प्रसासनाच्या सूचना आहेत. आत्तापर्यंत ह्युस्टनमध्ये 4 इंचांपर्यंत, न्यू ऑर्लीन्सच्या आसपास सुमारे 10 इंच आणि फ्लोरिडा पॅनहँडलच्या आसपासच्या शहरांमध्ये 12 इंचांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आणखीही हिमवादळे येण्याच्या सूचना आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क राज्यातील बफेलो शहराला बसला आहे. येथील सर्वच भागात दाट बर्फ पडल्यामुळे विद्युत आणि पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. (International News)
सई बने