आपण सापाचे सोशल मीडियात विविध व्हायरल झालेले व्हिडिओ पाहतो. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियात एका अजगराने वृद्ध महिलेला जीवंत गिळल्याचे प्रकरण समोर आले होते. तेव्ह त्या अजगराचे पोट फाडून महिलेला बाहेर काढले गेले होते. या घटनेचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. अशातच सापाला पाहून आपल्याला भीतीच वाटते. तुम्ही किती ही चालाख, हुशार असाल पण सापाला समोर पाहून आपली घाबरगुंडी होतेच. मात्र जर रात्री झोपल्यानंतर सापाने तुमच्यावर हल्ला केल्यास तर काय करु शकतो आपण? काहीच नाही. काही वेळेस असे ही होते की, झोपल्यानंतर साप केसांमध्ये किंवा कपड्यांमध्ये शिरु शकतो. मात्र एखाद्याच्या तोंडात कसा जाईल? ही गोष्ट न पटण्यासारखी जरी असली तरीही ती घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ ही सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Sneak Stuck in Mouth)
झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला साप
एक महिला गाढ झोपेत होती आणि सापाने तिचे तोंड हे बिळ असल्याचे समजून त्याच शिरकाव ही केला. जेव्हा या बद्दल कळले असता डॉक्टरांना महिलेच्या तोंडातून साप बाहेर काढण्यासाठी फार मोठे परिश्रम करावे लागले. सापाला तोंडातून बाहेर काढताना डॉक्टरांना ही भीती वाटत होती की तो त्यांना चावेल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसते की, महिला ही बेशुद्ध झाली असून तिच्या तोंडात एक खास स्टिक टाकून साप बाहेर काढला जात आहे. हळूहळू तो साप डॉक्टरांनी अखेर यशस्वीपणे महिलेच्या तोंडातून बाहेर काढला. असे सर्व करताना डॉक्टरांना सुद्धा संयमाने ते काम करावे लागले कारण आधीच त्यांना सुद्धा साप तोंडात घुसल्याने भीती वाटत होती.(Sneak Stuck in Mouth)
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ समाजात वराला मुलीकडून दिले जातात चक्क २१ साप, काय आहे ही परंपरा?
व्हिडिओ हा सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्या व्हिडिओत असे दिसत की, महिलेच्या तोंडात चक्क ४ फूट लांबीचा साप घुसला होता जो डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढला. व्हिडिओ जरी ११ सेकंदाचा असला तरीही तो पाहून अंगावर काटाच येतो. लाखो लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना आता एकच प्रश्न पडला आहे की, नक्की साप असा कसा तोंडात शिरला?