Home » भारतातील ‘ही’ आहेत नागदेवतेची मंदिरे

भारतातील ‘ही’ आहेत नागदेवतेची मंदिरे

by Team Gajawaja
0 comment
Snake temples of India
Share

मंदिरे हे आस्थेचे प्रतीक असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार मंदिरात पूजा केली जाते. दरम्यान, जेव्हा मंदिराबद्दल बोलले जाते तेव्हा मनोभावे भाविक येथे येतात आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. परंतु भारतात अशी काही मंदिरे आहेत तेथे फक्त नागांची पूजा केली जाते. अशा मंदिरांच्या परिसरात सुद्धा अगदी सहज सापांचा वावर आढळून येतो. पण येथे येणारे भाविक त्यांना न घाबरता त्यांची पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवतात. तर भारतातील अशीच काही नागदेवतांच्या मंदिरांबद्दल आपण जाणून घेऊयात.(Snake temples of India)

मन्नारसाला मंदिर, केरळ
हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि मोठे मंदिरांपैकी एक आहे. जे केरळातील मन्नारसाला येथे स्थित आहे. येथील हे मंदिर नागांचा राजा भगवान नागराज याला समर्पित करण्यात आले आहे. या मंदिराच्या परिसरात जवळजवळ ३० हजार दगडांवर सापांच्या मुर्त्या आणि चित्र आहेत. हे पाहणे एक अद्भूत नजाऱ्यापैकी एक आहे. असे मानले जाते की, हे मंदिर तीन हजार वर्ष जुने आहे. या मंदिरात नवविवाहित आणि मुलं नसलेल्या दांपत्यांद्वारे मंदिरात जाण्याची परंपरा आहे. हे दांपत्य मंदिरात जाऊन नाग देवतेकडे मुलासाठी प्रार्थना करतात.

कुक्के सुब्रमण्य मंदिर, कर्नाटक
कुक्के सुब्रमण्य मंदिराची मुख्य देवता भगवान सुब्रमण्यम, भगवान वासुकी आणि शेषनाग देवता आहे. हे मंदिर सुरम्य कुमार पर्वताच्या शिखरावर आहे आणि कुमारधारा नदीने वेढलेले आहे. येथील अशी मान्यता आहे की, वासुकी आणि अन्य सापांनी सुब्रमण्यमच्या गुफांमध्ये शरणागती पत्करली होती. त्यामुळे स्थानिक लोक जेव्हा या मंदिरात जातात तेव्हा त्यांच्या धार्मिक भावना या नेहमीच दिसून येता. असे ही मानले जाते की. मंदिरात गेल्याने सर्प दोष ही दूर होतो.

Snake temples of India
Snake temples of India

शेषनाग मंदिर, जम्मू आणि कश्मीर
पौराणिक कथेनुसार शेषनाग ज्याला सापांचा राजा असे म्हटले जाते. परंतु पहलगामच्या येथे एक झरा तयार करण्यात आला. असे मानले जाते की, शेषनाग आजही तेथे राहतात आणित्याच्या तटावर नाग देवतेला समर्पित एक मंदिर उभारण्यात आले. भाविक आपल्या अमरनाथ गुफेची यात्रा केल्यानंतर या झऱ्याजवळ येतात. येथे येऊन शेषनागाची पूजा करतात. या धार्मिक स्थळाचा परिसर अतिशय आकर्षक आहे.

हे देखील वाचा-  भारतातले हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच उघडले जाते कारण….

भुजंग नागा मंदिर, गुजरात
भुजिया किला गुजरातमध्ये भुजच्या बाहेरच्या परिसरात उभारण्यात आले आहे. लोककथांच्या नुसार, हा किल्ला शेवटच्या नागा वंशाच्या भुजंगाला समर्पित आहे.जे युद्धात मारले गेले. त्यानंतर, स्थानिक लोकांनी त्यांच्या स्मरणार्थ भुजिया टेकडीवर एक मंदिर बांधले, ज्याला भुजंग नागा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी नागपंचमीला मंदिराभोवती जत्रा भरते. सध्या हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असून त्याचा वापर दारूगोळा साठवण्यासाठी केला जातो.(Snake temples of India)

अगसनहल्ली नागप्पा, बंगळुरु
हे मंदिर भगवान नरसिंह यांच्यासाठी उभारण्यात आले आहे. जे भगवान सुब्रमण्य मरुपात आहे. गर्भगृहात भगवान नरसिंहाची नैसर्गिकरित्या तयार केलेली प्रतिमा आहे.मंदिराभोवती सोनेरी रंगाचा नाग अनेकदा दिसतो. अमावास्येच्या दिवशी भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात. आगसनहल्ली हे नाव अगस्त्य ऋषींच्या नावावरून पडले आहे, ज्यांनी येथे ध्यान केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.