Home » सोन्यापेक्षा सापाचे विष महागडे, 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल हैराण

सोन्यापेक्षा सापाचे विष महागडे, 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल हैराण

सापाचे विष हे अत्यंत महागडे असते. काही प्रजातिंच्या सापांचे विष हे सोन्याच्या किंमतीपेक्षाही अधिक असते. भारतात आढळणाऱ्या स्पेक्टेकल्ड कोबारा याचे एक ग्रॅम विषाची किंमत तब्बल साडे बारा हजार रुपये आहे.

by Team Gajawaja
0 comment
snake poison
Share

नोएडा पोलिसांकडून पाच लोकांना साप आणि त्याच्या विषासह अटक केल्यानंतर सापाचे विष अधिकच चर्चेत आले आहे. या प्रकरणात युट्युबर, इंन्फ्लूएंसर आणि बिग बॉस ओटीटी-2 चा विजेता एल्विश यादव याचे नाव समोर आल्याने हे प्रकरण हाय प्रोफाइल झाले आहे. खरंतर भारतात सापाचे विष पडकले जाण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये काही लोकांकडून दीड अरब रुपयांचे सापाचे विष जप्त करण्यात आले होते. सापाचे विष हे अत्यंत महागडे असते. काही प्रजातिंच्या सापांचे विष हे सोन्याच्या किंमतीपेक्षाही अधिक असते. भारतात आढळणाऱ्या स्पेक्टेकल्ड कोबारा याचे एक ग्रॅम विषाची किंमत तब्बल साडे बारा हजार रुपये आहे. (Snake Poison)

भारतात प्रत्येक वर्षाला 50 हजार लोक विषारी साप चावल्याने मरतात. एका बाजूला विषारी साप चावल्याने मृत्यू होतो. तर दुसऱ्या बाजूला ते व्यक्तींचा जीव वाचवण्यास ही कामी येते. सापाच्या विषापासून औषध तयार केली जातात. पण आता जगभरात नशा करणारी लोक विषारी सापाचे विष नशेच्या रुपात वापर करू लागले आहेत. नोएडा पोलिसांनी असे म्हटले आहे की, त्यांनी ज्या पाच लोकांना अटक केले आहे ते रेव्ह पार्टीत नशा करण्यासाठी सापाचे विष आणि सापांचा सप्लाय करतात.

प्रजाति आणि देशानुसार किंमती
जगभरात जवळजवळ तीन हजार प्रकारचे साप आढळतात. भारतात 272 प्रजाति आहेत. यापैकी केवळ 58 प्रजातिचे साप विषारी आहेत. कॉमन करैत, रसल्स वाइपर, सॉ-स्केल्ड वाइपर आणि इंडियन कोबरा हे भारतातील चार विषारी साप आहेत. सापांच्या विषांची किंमत त्यांच्या प्रजातिच्या आधारावर वेगवेगळे असे. या व्यतिरिक्त विविध देशात त्याच्या किंमतीही वेगवेगळ्या आहेत. जसे की, चीनमध्ये सापाचे विष युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत फार स्वस्त आहे. (Snake Poison)

का ऐवढे महाग असते विष?
सापाचे विष अत्यंत दुर्मिळ असते. ते फार कमी प्रमाणात निघते. याच कारणास्तव त्याची किंमत फार अधिक असते. साप पाळणे अथवा त्यांचे विष काढणे अत्यंत खतरनाक काम आहे. जगभरात हे मोठ्या प्रमाणात होत नाही. सापाच्या विषात असणाऱ्या प्रोटीनचा वापर काही आजारांसाठी केला जातो. जसे की, हार्ट अटॅक, स्ट्रोक, अल्जाइमर आणि पार्किंसन रोगाच्या उपचारासाठी केला जातो.


हेही वाचा- चीनमधील ‘या’ गावात केली जाते विषारी सापांची शेती


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.