तरुणांमध्ये सध्या धुम्रपान करण्याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तसेच धुम्रपान केल्याने कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे सुद्धा विविध जाहीरातींच्या माध्यमातून दाखवले जाते. अशातच न्यूझीलंडच्या सरकारने तरुणांना आयुष्यभर सिगरेट खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. याला कायदेशीर रुप ही दिले आहे. या कायद्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला तंबाखूची विक्री केली जाणार नाही. म्हणजेच सिगरेट खरेदी करण्याचे कमीत कमी वय हे वेळेनुसार वाढणार आहे.(Smoking ban law)
म्हणजेच एखादा व्यक्ती जो आतापासून ५० वर्षानंतर सिगरेटचे एक पॅकेट खरेदी करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. जेणेकरुन त्याचे वय कमीत कमी ६३ वर्ष आहे. दरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांनी अशी अपेक्षा केली आहे की, याआधीच धुम्रपान करण्याचा स्तर कमी होईल. न्यूझीलंडने २०२५ पर्यंत देश हा धुम्रपान मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नव्या कायद्यानंतर तंबाखूची विक्री करण्यासाठी मानत्याप्राप्त विक्रेत्यांची संख्या ६ हजारांवरुन ६०० ऐवढी होईल. तसेच धुम्रपान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूत निकोटीनचे प्रमाण ही अगदी कमी असेल. याआधी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेराल यांनी संसदेत असे म्हटले होते की, अशा प्रकारचे उत्पादन विक्री करण्यासाठी परवानगी देण्यामागे काही योग्य नाही. उलट यामुळे याचा वापर करणाऱ्यांचा मृत्यूच होतो. त्यामुळे भविष्यात ही समस्या आम्ही संपवणार आहोत. कारण त्यासाठी आम्ही हा कायदा पारित करु. धुम्रपानामुळे होणारे आजार जसे की, कॅन्सर, हृदयविकाराचा झटका यासाठी खुप खर्च येतो.(Smoking ban law)
हे देखील वाचा- अफगाणिस्तानात जगणं झालंय मुश्किल, १० पैकी ९ लोकांवर उपासमारीची वेळ
पीढीनुसार बदल आणणार कायदा
वेराल यांनी असे म्हटले की, पीढीनुसार बदल आणणा आहोत. तरुणांसाठी उत्तम आरोग्याचा आम्ही विचार करत आहोत. संसदेत ४३ च्या तुलनेत ७६ मताने हे विधेयक पारित झाले आहे. विधेयकाचा विरोध करणारा पक्ष एसीटी पार्टीने असे म्हटले की, सिगरेटच्या विक्रीवर बंदी घातल्याने काही लहान दुकानांचा व्यवहार बंद होईल. स्टॅटिस्टिक्स न्यूझीलंडने गेल्या महिन्यात आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, न्यूझीलंडमध्ये आठ टक्के वयस्कर हे प्रतिदिन धुम्रपान करतात. जे दहा वर्षांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी कमी आहे. न्यूझीलंड मध्ये १८ वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील लोकांना सिगरेटची विक्री करण्यासाठी आधीच नियंत्रित केले आहे.