Home » स्मार्टफोनची स्क्रिन स्वच्छ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्मार्टफोनची स्क्रिन स्वच्छ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्मार्टफोन स्वच्छ करताना नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा स्मार्टफोनसह त्याची स्क्रिन खराब होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.

by Team Gajawaja
0 comment
smartphone tips
Share

Smartphone Tips : स्मार्टफोनचा वापर सर्व वयोगटातील व्यक्ती करतात. पण बहुतांश लोकांना त्याची व्यवस्थितीत काळजी घेता येत नाही. याच कारणास्तव स्मार्टफोन बिघडला जातो. स्मार्टफोन दीर्घकाळ टिकावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

काहीजण फोनची स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करतात. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे फोन लवकर बिघडला जाऊ शकतो.  स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून स्मार्टफोन स्वच्छ होईल आणि त्याची काळजी ही घेतली जाईल.

स्मार्टफोन स्वच्छ करताना काय कराल?
स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी नेहमीच माइक्रोफायबर कापडाचा वापर करावा. या कापडाचा वापर केल्याने तुमच्या फोनवरील धूळ निघून जाईल. त्याचसोबत हाताचे ठसे देखील दिसून येणार नाहीत. याशिवाय स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी 70 टक्के अल्कोहोल असणाऱ्या क्लिनरचा वापर करू शकता.

smartphone tips

smartphone tips

ही चूक करू नका
स्मार्टफोन स्वच्छ कररताना कधीच हाय कॉन्ट्रास असणारे क्लिनर वापरू नका. कारण यामुळे तुमचा फोन बिघडला जाऊ शकतो. याशिवाय फोनमधील इंटरनल पार्ट डॅमेज होऊ शकतात. (Smartphone Tips)

सावधगिरी बाळगा
स्मार्टफोन चार्जिंगला लावला असल्यास तो स्वच्छ करू नका. नेहमीच फोन स्विच ऑफ करूनच स्वच्छ करा. याशिवाय फोन स्वच्छ करण्यासाठी माइक्रोफायबर कापडाचा वापर करावा. तुमच्याकडे माइक्रोफायबर कापड नसल्यास टिश्यू पेपरने स्वच्छ करा. याशिवाय फोन स्वच्छ करण्यासाठी स्क्रिनवर थेट लिक्विडचा वापर करू नका. लिक्विड माइक्रोफायबर कापड किंवा पेपरवर लावून स्क्रिनसाठी वापरा.


आणखी वाचा:

Truecaller नव्हे तर ‘या’ ट्रिकने ओळखता येईल तुम्हाला कोण फोन करतेय

फुटलेल्या स्क्रिनचा मोबाइल वापरताय? व्हा सावध, अन्यथा…

फोनवर व्हिडीओ, गाणी ऐकताना सतत जाहिरात दाखवली जाते? टाळण्यासाठी करा ही सेटिंग


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.