Home » नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
Smartphone Buying Tips
Share

जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर काही गोष्टींजी काळजी घेणे आवश्यकच असते. त्याचसोबत आपण एखादा स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी लाइफ, परफॉर्मेन्स, फिचर्स किंवा कॅमेरा, रिव्हू पाहतो. तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी लक्षात घेतल्या नाहीत तर तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. (Smartphone Buying Tips)

-स्मार्टफोनचे डिझाइन आणि क्वालिटी
जर तुम्हाला नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सर्वात प्रथम आपले लक्ष त्याच्या लूककडे जाते. त्याचसोबत स्मार्टफोनची बिल्ट क्विलिटी ही तपासून पहा. काही वेळेस असे होते की, तुमच्या हातातून स्मार्टफोन काही वेळा खाली पडल्यास त्याच्या स्क्रिनला तडा जाऊ शकते. त्यामुळे फोन खरेदी करताना त्याची बॉडी मजबूत असावी.

-स्मार्टफोनचा डिस्प्ले असा असावा
कोणत्याही स्मार्टफोनचा डिस्प्ले फार महत्वाचा असतो. फोनमध्ये व्हिडिओ पाहणे ते व्हिडिओ एडिट करण्यापर्यंतच्या काही गोष्टी फोनच्या डिस्प्लेवर अवलंबून असतात. अशातच फोनच्या डिस्प्लेची क्वालिटी उत्तम असावी. तुमच्या फोनचा डिस्प्ले ५.५ इंच ते ६ इंचा पर्यंत असावा. त्याचसोबत फुल एचडी प्लस किंवा एमोलेड डिस्प्ले असावा. फोनचा उत्तम डिस्प्ले असेल तर तुम्हाला तो वापरण्यास ही मजा येईल.

-फोन मल्टिटास्किंग असावा
फोनमध्ये उत्तम प्रोसेसर असणे फार गरजेचे आहे. जर तुमचा फोन फ्लॅगशिपमध्ये आहे तर त्यामध्ये स्नॅपड्रॅगन ८७० किंवा त्यावरील मीडियाटेक डाइमेंसिटी ८१०० किंवा त्यावरील वर्जन असावे. फोनमध्ये उत्तम OS वर्जन असावे. स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर असा ही असावा की, जो तुमचा फोन वारंवार हँग होईल अशी समस्या उद्भवणार नाही. कारण काही गेम्स किंवा व्हिडिओ एडिटिंगच्या वेळी फोन हँग होतो. त्यामुळे याची खास काळजी घ्यावी.

हे देखील वाचा- एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटरवर नवे बदल होण्याची घोषणा, लवकरच येणार नेविगेशन फिचर

-स्मार्टफोनची बॅटरी सर्वाधिक महत्वाची
जर तुमचे सर्वाधिक काम फोनच्या माध्यमातून होत असेल किंवा व्हिडिओ तयार करत असाल तर असा फोन खरेदी करा ज्याची बॅटरी बॅकअप उत्तम असेल. कारण फोनमध्ये गेमिंग, एडिटिंग आणि व्हिडिओ सुरु केल्यानंतर बॅटरी लवकर संपते. तुमच्या फोनमध्ये ५००० एमएएच किंवा त्यावरील बॅटरी असणारा फोन असावा. जर तुम्ही फार कमी फोनचा वापर करत असाल तर ३००० एमएएच बॅटरी असाणारा स्मार्टफोन ही खरेदी करु शकता.(Smartphone Buying Tips)

-सर्विस सेंटर
कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा, त्यामध्ये जर भविष्यात एखादी समस्या उद्भवल्याल तर त्यासाठी सर्विस सेंटर असावे. ते सर्विस सेंटर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर उत्तम.कारण काही वेळेस आपण स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्यानंतर काही ठिकाणी सर्विस उपलब्ध करुन दिली जात नाही. त्यामुळे ही गोष्ट सु्द्धा सर्वात प्रथम लक्षात ठेवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.