Smartphone affect on relationship : आजकाल लहान मुलं ते घरातील मोठ्या मंडळी देखील स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करताना दिसून येतात. स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. याशिवाय आपल्या खासगी आयुष्यातील कामे देखील स्मार्टफोनमुळे फार सोपी झाली आहेत. पण याचे काही नुकसान देखील आहे. स्मार्टफोनमुळे आपल्या आरोग्यावरच नव्हे तर नात्यावर देखील सखोल परिणाम पडू शकतो. कारण आपण आपला बहुतांश लोक स्मार्टफोनचा वापर करतात. काम करण्यासाठी स्मार्टफोन वापरणे योग्य आहे. पण रिकाम्यावेळी उगाचच स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
स्मार्टफोनचा सतत वापर करताना परिणाम आपल्या नात्यावर होऊ शकतो. ऐवढेच नव्हे तर बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा डिनरला गेल्यानंतर बहुतांशजण फोनचाच वापर करतात.
दुर्लक्षिततेची भावना निर्माण होते परिवार आणि पार्टनरला सर्वाधिक मोबाइलचा वापर करताना पाहिल्यानंतर तुम्हाला राग येऊ शकतो. अथवा तुम्हाला एकटे वाटू शकते. अशातच त्यांचे असे वागणे तुम्हाला आवडणार नाही. भले तुमच्या मनात पार्टनरबद्दल खूप प्रेम असले तरीही त्याच्या अशा वागण्यामुळे तुम्ही दुखावले जाऊ शकतात.
एकमेकांपासून दूर होता
स्मार्टफोनच्या सातत्याच्या वापराने नात्यात बहुतांशजणांना आपण एकमेकांपासून दूर झाल्याचे वाटू शकते. यामुळे मुलांसाठी किंवा मित्रपरिवारासाठी तुम्ही वेळ जरुर काढा. (Smartphone affect on relationship)
वाईट वाटू शकते
पार्टनर किंवा परिवारासोबत असताना तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर असे करू नका. तुमच्या नात्यात फूट देखील पडू शकते. यामुळे परिवारासोबत उठताना बसताना स्मार्टफोनचा वापर करणे टाळा.