Money Management : आजच्या वाढत्या महागाईच्या काळात ‘महिना संपायच्या आधीच पगार संपतो’ ही समस्या अनेकांच्या आयुष्यात कायमचीच झाली आहे. घरखर्च, ईएमआय, बिले, किरकोळ खर्च, वैद्यकीय गरजा अशा अनेक गोष्टींमध्ये पगार कसा नाहीसा होतो कळतही नाही. पण यावर उपाय आहे योग्य बजेटिंग आणि स्मार्ट मनी मॅनेजमेंट. काही सवयी बदलल्या तर पगार महिनाभर पुरेलच नाही तर बचतही होऊ शकते. (Money Management )
महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘50-30-20’ नियमाने बजेट तयार करा आर्थिक तज्ञांच्या मते, पगार मिळताच सर्वप्रथम बजेट तयार करणे सर्वात महत्त्वाचे ठरते. 50-30-20 हा नियम अत्यंत सोपा आणि प्रभावी आहे. यात 50% रक्कम अत्यावश्यक खर्चासाठी जसे की घरभाडे, किराणा, वीज, प्रवास यासाठी वापरायची. 30% लाईफस्टाईल खर्चांसाठी जसे की खरेदी, आउटिंग्स, इ. आणि उरलेली 20% रक्कम बचत किंवा गुंतवणुकीत टाकायची. या नियमाने आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता आणि पैसे कुठे उगाच जात आहेत तेही कळते. (Money Management )

Money Management
खर्चाची नोंद ठेवा लहान खर्चही लिहून ठेवा अनेकदा पगार कमी नसतो, पण अनावश्यक आणि ठरवलेले नसलेले खर्च जास्त होतात. चहा-कॉफी, ऑनलाइन ऑर्डर्स, सबस्क्रिप्शन्स, छोट्या-छोट्या खरेदी यातच हजारो रुपये महिनाभरात निघून जातात. म्हणून दररोजचा खर्च एका नोटबुक, अॅप किंवा एक्सेल शीटमध्ये लिहून ठेवा. एक महिन्यानंतरच तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी पैसे वाया जात आहेत आणि कुठे कट करू शकता.
बचत ‘उरली तर’ नको पगार मिळताच ऑटो-सेव्हिंग सुरू करा बहुतांश लोक बचत शेवटी करतात—‘महिना संपला की जे उरेल ते वाचवू’ पण प्रत्यक्षात काहीच उरत नाही. म्हणून पगार मिळताच एक निश्चित रक्कम RD, SIP किंवा सेव्हिंग अकाऊंटमध्ये ऑटो-डेबिट करून ठेवा. हे ‘Pay Yourself First’ तत्त्व आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एकदा सराव झाला की बचत सहजपणे वाढू लागते. (Money Management )
क्रेडिट कार्डचा वापर सांभाळून अनावश्यक EMI टाळा आजकाल प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो, पण याच कारणाने महिनाअखेरीस आर्थिक ताण येतो. No-cost EMI नावाखाली अनावश्यक वस्तू विकत घेतल्या जातात. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर फक्त आवश्यक गोष्टींसाठीच करा. वेळेवर बिल भरा, नाहीतर व्याजदराबरोबर आर्थिक बोजा वाढत जातो. घरगुती बजेट बिघडण्यामागे ही एक मुख्य कारणे आहे. (Money Management )
=====================
हे देखिल वाचा :
Airless Tyre : एअरलेस टायर किती टिकतात? जाणून घ्या ते ट्यूबलेसपेक्षा किती चांगले आणि फायदेशीर आहेत
Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला खात्यात जमा होतील ₹9,250
Kitchen Tips : पहिल्यांदा मातीची भांडी वापरताय…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो
======================
एक इमर्जन्सी फंड तयार ठेवा अनपेक्षित खर्चासाठी अत्यावश्यक आजारीपण, अपघात, अचानक होणारा मोठा खर्च किंवा जॉबमध्ये अडचण—अशा प्रसंगी इमर्जन्सी फंडच उपयोगी पडतो. किमान ३ ते ६ महिन्यांचा खर्च वेगळा ठेवला तर महिनाअखेरीचा आर्थिक ताण कमी होतो. हा फंड नियमित FD, सेपरेट सेव्हिंग अकाऊंट किंवा लिक्विड फंडात ठेवू शकता. पगार पुरत नाही ही समस्या पगार कमी असल्यामुळे नसते, तर मनी मॅनेजमेंट योग्य नसल्यामुळे होते. खर्चावर नियंत्रण, ऑटो-सेव्हिंग, योग्य बजेट आणि स्मार्ट आर्थिक सवयीया काही उपायांनी तुमची आर्थिक स्थिती बदलू शकते. आजपासूनच हे नियम पाळायला सुरुवात करा आणि तुमचे महिनाअखेरीचे आर्थिक चित्र कसे सुधारते ते स्वतः पाहा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
