Home » Saudi :२० वर्ष कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे निधन

Saudi :२० वर्ष कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे निधन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saudi
Share

सौदी अरेबियाचे राजकुमार अल वालिद बिन खालिद बिन तलाल अल सौद उर्फ ”झोपेचा राजकुमार” म्हणून ओळखले जाणारे राजकुमार यांचे शनिवारी १९ जुलै रोजी निधन झाले. ते गेल्या २० वर्षांपासून कोमात होते. त्यांना स्लीपिंग प्रिन्स म्हणून ओळखले जात असे. वयाच्या ३६ व्या वर्षी प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे निधन झाले. रॉयल कोर्टाने सौदी प्रेस एजन्सीद्वारे त्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे. (Marathi News)

प्रिन्स अल वालिद हे सौदी राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य प्रिन्स खालेद बिन तलाल यांचे पुत्र आणि अब्जाधीश प्रिन्स अल वालिद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म एप्रिल १९९० मध्ये झाला. सौदी अरेबियातील काही माध्यमांच्या अहवालानुसार, २००५ मध्ये एका रस्ते अपघातात प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यानंतर ते कोमात गेले. रियाधमधील किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटीमध्ये मशीनद्वारे त्यांना जिवंत ठेवण्यात आलेले आहे. (Todays Marathi HEadline)

सौदी सरकारने राजकुमारावर उपचार करण्यासाठी अमेरिका आणि स्पेनमधील अतिशय तज्ज्ञ आणि हुशार डॉक्टरांची टीम उपचारासाठी बोलावली होती. मात्र या निष्णात डॉक्टरांना देखील राजकुमाराला बरे करण्यात यश आले नाही. ते कधीही पूर्ण शुद्धीवर आले नाही. कधीकधी त्यांच्या शरीराची हालचाल होत असे, जी पाहून त्यांच्या कुटुंबाला राजकुमार बरा होईल आशा होती. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीयदृष्ट्या बेशुद्ध घोषित केले. त्यांचे वडील प्रिन्स खालिद यांनी राजकुमारावर उपचार थांबवण्यास नकार दिला होता. ते म्हणायचे की, जीवन ही अल्लाहची देणगी आहे आणि फक्त तोच ते परत घेऊ शकतो. (Latest Marathi News)

Saudi

राजकुमाराला रियाधमधील राजवाड्यातील एका खास खोलीत ठेवण्यात आले. येथे डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय मदत २४ तास उपलब्ध होती. प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल हे आधुनिक सौदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुल अजीज यांचे पणतू आणि प्रिन्स तलाल बिन अब्दुल अजीज यांचे नातू आहे. सद्याच्या राजाशी त्यांचा थेट संबंध नसला तरी, सलमान बिन अब्दुल अझीझ हे त्यांचे पणजोबा आहेत. (Top Trending Headline)

व्यक्ती कोमात गेला म्हणजे नक्की काय?
व्यक्ती कोमात जाणे हा आजार नाही तर मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीचे लक्षण आहे. कोमा म्हणजे बेशुद्धीची अवस्था असून बाह्यता ती अवस्था गाढ झोपेसारखी असते. मात्र, ओरडणे किंवा वेदना यामुळे माणूस जागा होत नाही. अशावेळी श्वसन किंवा नाडीचे ठोके अनियमित पडतात. अशी व्यक्ती कोणताही कृती करत नाही. तसेच, त्या व्यक्तीचे झोपेचे चक्रही सुरू नसते. (Top Stories)

============

हे देखील वाचा : Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!

============

कोमात जाण्याची कारणे कोणती?
कधी हाय ब्लडप्रेशर कधी शुगर वाढल्याने कोमात गेल्याचे किंवा कधी हृदयाशी संबंधित प्रदीर्घ दुखण्यामुळे मेंदूला रक्त तसेच प्राणवायूचा पुरवठा कमी होऊन पेशंट कोमामध्ये गेल्याचे तर कधी रस्त्यावरच्या वाढत्या अपघातात पेशंट कोमात गेल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो. यासोबतच मेंदूला मार लागणे, मेंदूतील रक्तस्त्राव, मेंदूला होणारा संसर्ग, स्ट्रोक, यकृताचे विकार, हृदयविकार, शरीरातील ऑक्सिजनची कमतरता आदी कारणांमुळे देखील व्यक्ती कोमात जाऊ शकते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.