Home » Skin Tightening Home Remedies: चेहऱ्यावरील त्वचा घट्ट आणि चमकदार करण्यासाठी फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Tightening Home Remedies: चेहऱ्यावरील त्वचा घट्ट आणि चमकदार करण्यासाठी फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्यावरील वृद्धत्वाचे परिणाम जसे सुरकुत्या आणि त्वचेचा सैलपणा स्पष्टपणे दिसू लागतो.

0 comment
Skin Tightening Home Remedies)
Share

पुरुष असो किंवा स्त्री तरुण आणि सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण वाढत्या वयाचा परिणाम टाळणे सोपे नसते. जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्यावरील वृद्धत्वाचे परिणाम जसे सुरकुत्या आणि त्वचेचा सैलपणा स्पष्टपणे दिसू लागतो. वयाच्या 30 व्या वर्षानंतर अशी लक्षणे जरा जास्तच दिसू लागतात, जी चिंतेची बाब आहे, विशेषत: ज्यांना दीर्घकाळ तरुण दिसायचे आहे त्यांच्यासाठी तर नक्कीच. तुमची त्वचा वयाआधीच म्हातारी दिसू लागली आहे, चेहऱ्याची त्वचा लटकतेय किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या आहेत. आणि तुम्ही दर महिन्याला त्यावर महागड्या क्रीम लावून वैतागल्या आहात तर काळजी करू नकाआज आपण तुमच्या या समस्यांवर काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Skin Tightening Home Remedies)
Skin Tightening Home Remedies

Skin Tightening Home Remedies

 
चेहऱ्याची त्वचा टाइट आणि चमकदार करण्यासाठी घरगुती उपाय:
 
– खोबरेल तेलाचा वापर त्वचेला घट्ट करण्याच्या उपायात फायदेशीर ठरू शकतो. लेखात वर नमूद केल्याप्रमाणे, त्वचा सैल होण्याचे एक कारण त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनचे विघटन असू शकते. त्याचबरोबर खोबरेल तेलामुळे त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे नारळाचे तेल सैल त्वचा घट्ट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
 
– भरपूर पाणी पिणे हे आपली त्वचा चमकवण्यास मदत करते. पाणी आपल्या शरीरातील घाण काढून टाकते आणि शरीराच्या नवीन पेशी तयार करते. पाणी केवळ चेहरा चमकदारच करत नहीं तर पानी पिल्याने आपली अशरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे दिवसातून किमान ३ लीटर पाणी पिण्याचा सल्ला की दिला जातो. 
 
– तरुण दिसण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हळद, वेलची, केशराचे दूध पिणे चांगले मानले जाते. हे प्यायल्याने चांगली झोप तर येतेच, पण आपली त्वचा चांगली आणि निरोगी राहण्यास ही मदत होते. विशेष म्हणजे हे आपल्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकते. या सर्वांसोबत तुम्ही व्यायाम आणि योगा करत रहा. हे आपल्याला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करू शकते.(Skin Tightening Home Remedies)
Skin Tightening Home Remedies

Skin Tightening Home Remedies

 
– रोज सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत तर होईलच शिवाय चमकदार त्वचाही मिळेल. तसेच तुम्हाला हवं असेल तर या पाण्यात तुम्ही स्ट्रॉबेरीचा रस पाण्यात मिसळून ही पिऊ शकता.
 
– ऑलिव्ह ऑईल च्या मसाजने त्वचा घट्ट होण्याबरोबरच डार्क सर्कल आणि डागही दूर होतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.आणि ते तुमची त्वचा सुधरण्यास मदत करते. रोज रात्रि झोपताना तुम्ही हा उपाय करू शकता.  
 
– सैल त्वचेच्या उपायासाठी बदामाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. बदामाच्या तेलात असलेले इमोलिएंट आणि स्क्लेरोसेंट सारखे प्रभाव केवळ त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करू शकत नाहीत तर चेहर्यावरील रंग सुधारू शकतात आणि त्वचेचा टोन देखील सुधारू शकतात. त्यामुळे बदामाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. 
================================
हे देखील वाचा: Home Remedies for Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय !
================================
 
– अनेकांना रात्रीची डिम लाइट सुरु करून झोपायची सवय असते मात्र झोपताना खोलीचा लाईट बंद करा. जर प्रकाश असेल राहिला तर नकारात्मक ऊर्जा आपल्याला नीट झोपू देत नाही. लाईट बंद करून झोपल्याने तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल. तसेच आपल्या शरीराचे सर्व भाग विश्रांती घेऊ लागतील ज्यात तुमच्या त्वचेचा सुद्धा सहभाग असतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. अशा प्रकारे झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल.
 
– साबण वापरल्याशिवाय तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ वाटत नाही, पण तुम्हाला माहित आहे का की साबणाचा जास्त वापर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगला नाही? साबणामध्ये अशी काही रसायने असतात जी त्वचा निर्जीव बनवतात, एवढेच नाही तर आपली त्वचा कोरडी करून त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि ओलावा काढून टाकतात. साबणाच्या जागी तुम्ही फेसवॉश वापरू शकता. बाजारात काही नैसर्गिक फेस वॉश उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही.
 
(डिस्क्लेमर- वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याच्या आधी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.