Skin Care Tips : तुम्ही कोरड्या त्वचेचा समस्येचा सामना करत आहात का? पुढील काही गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिक्स करू शकता. खरंतर,मार्केटमध्ये तुम्हाला त्वचा मऊ आणि कोमल राहण्यासाठी काही प्रोडक्ट्स मिळतात. पण या प्रोडक्ट्समध्ये बहुतांशवेळा केमिकलचा वापर केलेला असतो. अशातच काही घरगुती वस्तूंचा वापर करून कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता.
गुलाब पाणी
आंघोळीच्या पाण्यात तुम्ही दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करून त्याने आंघोळ करू शकता. गुलाब पाण्यात नैसर्गिक मॉइश्चराइज गुण असतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी होण्याची समस्या कमी होऊ शकते. गुलाब पाणी केमिकलयुक्त वापरू नये.
मध
मध त्वचेसाठी एक नैसर्गिक मॉइश्चराइजर असते. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात दोन मोठे चमचे मध मिक्स करू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊ शकतो. मधात ब्लीचिंग गुणधर्म असतात. तुम्ही दररोज मध आंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्यास त्वचा उजळही होते.
दूध
दूधात असलेले फॅटी अॅसिड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे तुमच्या त्वचेला चमक येते. दूधात कोलेजन असतात. ब्लीचिंग प्रॉपर्टीजच्या कारणास्तव त्वचेचा रंग बदलला जातो. दूध पाण्यात मिक्स करून आंघोळ केल्यास त्वचा मऊ आणि कोमल होते.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. याचा वापर तुम्ही थेट त्वचेवर करू शकता. तुमची त्वचा कॉम्बिनेशन प्रकारची असल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करू शकता.
बदामाचे तेल
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. एक चमचा बदामाचे तेल आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून आंघोळ करा. बदामाच्या तेलामुळे तुमची त्वचेला चमक येण्यासह कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. (Skin Care Tips)
नारळाचे पाणी
तुम्ही आंघोळीच्या पाण्यात नारळाचे पाणी मिक्स करू शकता. याचा वापर आंघोळीच्या पाण्यासोबत केल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. नारळाचे पाणी अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात. शरिरात जर एखाद्या ठिकाणी सूज आल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यात नारळाचे पाणी मिक्स करू शकता.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)