Home » हातावर मेंदी काढताना खाज आणि जळजळ होते? करा हे घरगुती उपाय

हातावर मेंदी काढताना खाज आणि जळजळ होते? करा हे घरगुती उपाय

काहींना हातावर मेंदी काढल्यानंतर अॅलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो. हातावर खाज येणे किंवा जळजळ सुरू होते.

by Team Gajawaja
0 comment
Skin care Tips
Share

Skin Care Tips : सणासुदीच्या वेळी किंवा एखाद्या फंक्शनच्या वेळी महिलांना हातावर मेंदी काढणे फार आवडते. पण काहींना हातावर मेंदी काढल्यानंतर अॅलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो. हातावर खाज येणे किंवा जळजळ सुरू होते. यापासून दूर राहण्यासाठी काही उपाय करू शकता.

एलोवेरा जेलचा वापर
आजकाल मार्केटमध्ये केमिकलयुक्त मेंदीची विक्री केली जाते. याचा वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. मेंदी लावल्यानंतर तुम्हाला एखादी अॅलर्जी झाल्यास हाताला बर्फाने शेकवा. याव्यतिरिक्त तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला होणारी जळजळ कमी होईल.

नारळाच्या तेलाचा वापर
मेंदीमुळे होणाऱ्या अॅलर्जीवर तुम्ही नारळाचे तेल लावू शकता. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेवर होणारी जळजळ देखील कमी होऊ शकते. रात्री झोपण्याआधी आपल्या हातावर नारळाचे तेल लावून झोपू शकता. याव्यतिरिक्त लिंबूचा रसही वापरू शकता. लिंबूचा रसात एक कापड भिजवून 10 मिनिटे हातावर ठेवा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. या सर्व उपायांनी मेंदीमुळे होणारी जळजळ आणि खाज येण्याची समस्या कमी होईल. (Skin Care Tips)

या गोष्टींची घ्या काळजी
मेंदी लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हातांवर मेंदी लावण्याआधी पॅच टेस्ट जरुर करा. थोडीशी मेंदी हातावर लावून पाहा आणि थोडावेळ थांबा. जर मेंदी लावल्यानंतर त्वचेवर जळजळ अथवा खाज येत असल्यास अशा मेंदीचा वापर करू नका.


आणखी वाचा :
नववधू होणार असाल तर त्वचेसंबंधित ‘या’ चुका करणे टाळा
उन्हाळ्यात पायांना भेगा पडतात? करा हे घरगुती उपाय
दिवसरात्र काम करणाऱ्या व्यक्ती होऊ शकतात बर्नआउटच्या शिकार, जाणून घ्या लक्षणे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.